Saturday, November 23, 2024
Homeपुणेमावळमावळातील धामणे गावातील पवना नदीवर आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके..

मावळातील धामणे गावातील पवना नदीवर आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके..

मावळ (प्रतिनिधी):वन्यजीव रक्षक संस्था मावळ व शिरगांव पोलीसांकडून शिरगांव पोलीस स्टेशन हद्दीतील धामणे येथील पवना नदी येथे पूरजन्य परिस्थिती ,आपातकालीन परिस्थिती व आपत्ती व्यवस्थापनाबाबत डेमो कॅम्प घेण्यात आला.
सदर कॅम्पमध्ये वन्यजीवन रक्षक मावळ संस्था यांनी ॲम्बुलन्स ,बोट इत्यादी साहित्य वापरून सदरचा डेमो घेण्यात आला. त्यामध्ये एखादा व्यक्ती बुडाल्यास त्याला कसे वाचवायचे याचे डेमो द्वारे प्रशिक्षण देण्यात आले तसेच नागरिकांना व काव्या करीयर अॅकादमी यांना देखील सदरचा डेमो दाखवण्यात आला.

त्याप्रसंगी शिरगाव पोलीस स्टेशन च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ मॅडम, पी.एस.आय.कांबळे साहेब, पो. कॉ. समाधान फडतडे सह इतर पोलीस कर्मचारी तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे,संस्थेचे आपत्ती व्यावस्थापन सर्च आणी रेस्कु टिम चे अध्यक्ष गणेश निसाळ , उपाध्यक्ष गणेश ढोरे ,जीगर सोळंकी,सर्जेस पाटिल, सत्यम सावंत,शुभम काकडे,कुनाल दाभाडे ,ओमकार भेगडे ,सुरज शिंदे ,प्रशांत शेडे,गौरव चेपे,कमल परदेशी आदिजण या डेमो कॅंप मध्ये सहभागी होते.
सदर चा कॅम्प करण्याची शिरगाव पोलीस यांनी संस्थेला जी संधी दिली त्याबद्दल रेस्कु टिम चे अध्यक्ष गणेश निसाळ यांनी सर्व पोलीस अधीकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.
- Advertisment -

You cannot copy content of this page