Friday, September 20, 2024
Homeपुणेमावळमावळातील वराळे येथील घरात आढळले खवल्या मांजर..

मावळातील वराळे येथील घरात आढळले खवल्या मांजर..

मावळ (प्रतिनिधी):मावळातील वराळे येथील समता कॉलनीतील शशिकांत रमेश गिरी यांच्या घरात खवल्या मांजर आढळून आले.त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य रोहीत दाभाडे व शेखर खोमणे यांना फोन आला की शशिकांत गीरी यांच्या घरात काहीतरी वेगळ्या प्रकारचा प्राणी आढळला आहे. याची माहिती मिळताच सदस्यांनी त्यांनी त्या प्राण्याचे फोटो मागीतले असता ते खवल्या मांजर असल्याचे निदर्शनास आले.तदनंतर लगेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांना फोन करुन त्याची माहिती दिली व तात्काळ वराळे समता कॅालनीकडे निघाले,काही वेळातच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेची टीम संकेत मराठे,निनाद काकडे, प्रथमेश मुंगनेकर ,शेखर खोमणे,रोहीत दाभाडे,रोहन ओव्हाळ,नयन कदम,भास्कर माळी,गणेश गायकवाड,दत्ता भोसले, निलेश संपतराव गराडे त्या ठीकाणी पोहचले त्या ठिकाणाची पाहनी केली असता ते खवल्या मांजर असल्याचे समजले, ते जनरेटर रुम मध्ये जनरेटरच्या खाली बसल्याचे दिसले, घरातील वातावरण मात्र भिती चे होते व आजु बाजुला भरपुर लोक वस्ती होती.भटक्या कुत्र्यांच्या बाल्यामुळे ते खवल्या मांजर घाबरुन घरात शिरले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
वन्यजीव रक्षक संस्थेने याची माहिती वनविभागाला दिली
वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली
त्या खवल्या मांजरास सुरक्षीत पकडुन डॅा.दडके यांच्याकडे प्राथमिक तपासणी करुन ते खवल्या मांजराला काहीही ईजा नसल्याने लगेच जवळच्या जंगलात सोडण्यात आले.
अतीशय दुर्मिळ असे खवल्या मांजर मागील नऊ वर्षांपूर्वी देहुरोड येथे पन आढळले होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page