Friday, November 22, 2024
Homeपुणेतळेगावमावळातील विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचा विशेष अभिनव...

मावळातील विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचा विशेष अभिनव…

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाने संस्थांतर्गत 4 हजार 500 विद्यार्थ्यांसाठी प्रायोगिक तत्वावर सुरू केलेला अभिनव इतर शाळा आणि महाविद्यालयांसाठीही उपलब्ध करून देण्यात येईल , अशी माहिती संस्थेचे संचालक महेशभाई शहा यांनी दिली . उपक्रमात पुण्यातील न्यू समर्थ स्मार्ट स्कूलिंग संस्थेने त्यासाठी विनाशुल्क प्रशिक्षण सेवा दिली असून त्यात इयत्ता पहिली ते पदवी पर्यंतच्या अध्यापन करणाऱ्या 175 शिक्षकांचा समावेश आहे . नुकताच या प्रशिक्षण उपक्रमाचा समारोप झाला.


शासनाच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या या उपक्रमास राज्यातील ग्रामीण भागात राबविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे संजय देशमुख यांनी सांगितले . ते म्हणाले , की पारंपरिक शिक्षण पध्दतीतील सामाजिक मुल्यांना पुन्हा एकदा लागू करून शिक्षकांना अध्ययन आणि अध्यापनातील कौशल्ये प्रदान करणारा हा उपक्रम आहे.

गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक – विद्यार्थी पालक आणि संस्थाचालक अशी एकत्रित जबाबदारी घेण्यासाठी नूतन संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे आणि सचिव संतोष खांडगे यांनी पुढाकार घेतल्यामुळे हा उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी उपयुक्त ठरेल . यावेळी देशमुख यांनी शैक्षणिक अभ्यासक्रम , परीक्षा पध्दती व बदललेली काठीण्य पातळी , मोबाईल इंटरनेटचा गैरवापर , अध्यापनातील विद्यार्थ्यांची मर्यादा , अनुपस्थिती आणि पालकांचा हस्तक्षेप आदी विषयांचा गुणवत्ता वाढीवर होणाऱ्या विपरित परिणामांचा संदर्भ देत त्याचा दोष केवळ एकट्या शिक्षकावर टाकणे गैर असल्याचे सांगितले.

शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी भाषा प्रभुत्व , संवाद कौशल्य , ज्ञानविस्तार , स्मार्ट ड्रेसकोड , आकलन आणि अध्यापनातील सहजता , परीक्षा तंत्र , विद्यार्थ्यांच्या समस्या आणि मानसशास्त्र आदि विषयांवर प्रात्यक्षिकासह 175 शिक्षकांना कौशल्यप्राप्तीचे प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी संस्थेचे सहसचिव नंदकुमार शेलार , संचालक एस . एन . गोपाळे , यादवेंद्र खळदे , विनायक अभ्यंकर , स्मार्ट स्कूलिंगचे व्यवस्थापकीय संचालक संजय देशमुख उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page