if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
मावळ (प्रतिनिधी) : मावळातील शिवली गावात राहणाऱ्या चर्मकार कदम कुटुंबियाचा पूर्वीपासूनचा येण्या जाण्याचा रस्ता खोदल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तक्रारीचा राग मनात ठेवून गावातील गावगुंडांनी फावडे, दगडाने व लाथा बुक्क्यांनी चर्मकार कदम कुटुंबियांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ व महिलेचा विनयभंग केल्याची घटना शनिवार दि.11 रोजी सायंकाळी 7 वा. शिवली येथे घडली.
याबाबत सविता सुरेश कदम (रा. शिवली ता. मावळ) यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून त्यानुसार आरोपी नितेश अनंता आडकर, रामभाऊ नारायण आडकर, देविदास बबन आडकर, तानाजी रामभाऊ आडकर, संगीता अनंता आडकर (सर्व रा. शिवली ता. मावळ जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर या घटनेमध्ये सविता कदम, विशाल कदम, रमेश तिखे हे तिघे जण मारहाणीत जखमी झाले असून उपचार घेत आहेत.
वडगांव मावळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सविता कदम यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून शिवली गावात वास्तव्यास असून त्यांचा रोजचा येणेजाणेचा रस्ता खोदला असल्याची तक्रार शनिवारी दि.11 रोजी दु.12:30 वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये दिली. पोलिसांना तक्रार दिल्याचा राग मनात धरुन आरोपींनी शनिवार दि.11 रोजी सायंकाळी 7 वा. फावडे, दगडाने, लाथा बुक्क्यांनी कदम कुटुंबातील व्यक्तीना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग केला.
या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सचिन कदम करत आहेत. सदर गुन्ह्यातील आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही. संत रोहिदास महाराज समाज सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेतल्यावर सदर गुन्हा उशिरा दाखल करून घेण्यात आला असून त्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा अद्यापही दाखल केलेला नाही.