मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळ पासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून अमृताजण ब्रिज पासून सुमारे पाच ते सहा किमी पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
आज ख्रिसमस नाताळ आणि शनिवार रविवार अश्या सलग सुट्या आल्याने पर्यटक हे लोणावळा पुणे येथे फिरायला मोठ्या प्रमाणात बाहेर पडले असल्याने मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून पुणे लेन वर वाहनांच्या पाच ते सहा किमी पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत यांचा नाहक त्रास वाहन चालकांना होत आहे.