Sunday, August 3, 2025
Homeमहाराष्ट्ररायगड" मैत्रेय बहु उद्देशीय सामाजिक संस्था " यांच्या विद्यमाने ६६ वा धम्मचक्र...

” मैत्रेय बहु उद्देशीय सामाजिक संस्था ” यांच्या विद्यमाने ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव व सम्राट अशोका विजयादशमी हालीवली येथे मोठया उत्साहात साजरा !

अध्यक्ष अंकुश सुरवसे यांचे नेतृत्वाखाली कार्यक्रम संपन्न..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )भगवान गौतम बुद्धांनी स्थापित केलेले हे धम्म चक्र अडीच हजार वर्षांनी पुन्हा गतिमान करण्याचे काम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले , खरचं आता प्रत्येकाच्या मनात बुद्ध कोरले पाहिजे , १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमी दिनी बुद्ध धम्माची दिक्षा घेऊन बाबासाहेबांनी सीमोल्लंघन केले.
भगवान बुद्धांचे जन्म – ज्ञान व महापरिनिर्वाण वैशाखी पौर्णिमेला झाला , हा त्रिवेणी संगम एकाच पौर्णिमेला , म्हणून हे २५६६ वे धम्म चक्र प्रवर्तन दिन आहे , त्यांच्या कार्याचा अनुकरण आम्ही करत आहोत , झोपलेल्या मूडद्यांना स्पर्श करून जिवंत करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर होते , दिक्षा घेणारे आपले पूर्वज होते , आपण अजून दिक्षा घेतली नाही , असा ज्ञानाचा प्रवाह प्रमुख प्रवक्ते वैभव सोनावणे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनी मैत्रेय बहु उद्देशीय सामाजिक संस्था यांच्या विद्यमाने ६६ वा धम्म चक्र प्रवर्तन दिन महोत्सव व सम्राट अशोका विजयादशमी , सिग्नेचर डिझायर संकुल मैदान , हालीवली , तालुका कर्जत – रायगड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ” भन्ते सोरीपुत्र ” यांना धम्म दान देऊन यथोचित सत्कार करण्यात आले.सामूहिक सुत्तपठण घेण्यात आले.
लहान मुलांचे विविध भाषण व प्रतियोगीता घेऊन नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक आयु सुरेश भालेराव व त्यांची पत्नी सौ.प्रतिभा भालेराव यांचा भव्य नागरी सत्कार यावेळी करण्यात आला . वैभव सोनावणे – संस्थापक प्रबुद्ध परिवार मुंबई , अध्यक्ष संगिती फाउंडेशन , सुमित भालेराव – धम्मकाया फाउंडेशन कोकण महासचिव ,यांचा सत्कार शाल पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी केला.
यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की , आज आपल्यात शासनकर्ती जमात होणे गरजेचे आहे , शासकीय कार्यालयात मोक्याच्या जागा हासिल करा , शिक्षण नसेल तर आपणास गुलाम बनविले जाईल,अनेक जातीचा अंत करण्यासाठी बुद्ध धम्माची स्थापना डॉ बाबासाहेबांनी केली , आपल्याला बुद्ध हे आयते मिळाले , पण बाबासाहेबांना बुद्ध मिळवताना खूप संघर्ष करावा लागला , हे सांगत कोलंबिया च्या लायब्ररी मध्ये जाणारे पहिले विद्यार्थी बाबासाहेब , व तेथून निघणारे शेवटचा विद्यार्थी पण बाबासाहेब होते , त्यांनी अथक संघर्ष करून हा रथ येथवर आणला आहे.
बुद्धांचा संघ , सम्राट अशोकाचे शासन यातूनच स्वातंत्र्य – समता – बंधुता – न्याय हे सर्व लिहून संविधानाचा उदय झाला , यावर त्यांनी प्रकाश टाकला . तर अध्यक्ष अंकुश सुरवसे म्हणाले की , देशात आजही जातीयवाद बोकाळला आहे , वैचारिक , सामाजिक , राजकीय ही बुद्धांच्या तत्वज्ञानामूळे उदयास आले असून , अशोक चक्र , चार सिंह राजमुद्रा , हे बाबासाहेबांनी सर्वोच्च पदावर नेऊन ठेवले , म्हणून भौतिक तत्वज्ञान न सांगता बुद्धांचे धम्म सांगितल्यास प्रगती नक्कीच होईल , माणसांनी माणसांशी केलेला उचित व्यवहार म्हणजे धम्म , प्रत्येक कार्यकर्ता स्वयं प्रकाशित झाला पाहिजे , तरुणांनी पुढे येऊन जेष्ठांनी आता आशीर्वाद देण्याच्या भूमिकेत येणे गरजेचे असून संस्कार चांगले घडल्यास चांगले कार्यकर्ते घडतील ,असा तरुणांना संदेश त्यांनी याप्रसंगी दिला.
असे प्रेरणादायी व सामाजिक कार्यक्रम करण्यास संस्थेच्या सर्वांचा सहभाग व मदत होते म्हणून त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.यावेळी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेले प्रेम तांबे , श्रावणी तांबे , श्रुष्टी कसबे , धीरज गायकवाड , निहाल उबाळे , अबोली उबाळे , सिद्धांत ठोकळे , अपेक्षा ठोकळे , पियुष चौधरी , सोमय्या चौधरी ,यांना सन्मानित करण्यात आले .यावेळी कार्यक्रमाला हिरामण गायकवाड , किशोर गायकवाड , हरिश्चंद्र दादा यादव , सुनील आप्पा गायकवाड , अनिल गवळे , धर्मेंद्रदादा मोरे , सुनील सोनावणे , संतोष जाधव , प्रदिप ढोले , लोकेश यादव , राजू ढोले, अशोक जाधव ,विक्की जाधव , नंदकुमार जाधव , अतुल सोनावणे , सुनील वाघमारे ,अलपेश मोरे , सुरज पंडित ,आदी सामाजिक व राजकीय मान्यवरांनी भेट दिली.या धम्मचक्र प्रवर्तन दिनी अक्षता गायकवाड , सोनाली गायकवाड , वर्षा उबाळे , वर्षा लादे , शीतल वानखेडे , अश्विनी सुरवसे , जोत्स्ना कांबळे , मोनाली भोसले , जयश्री सुरवसे , माधुरी निकम ,धनश्री सुरवसे , स्वप्नाली तांबे , शशिकला ठोकळे , विद्या जाधव , रत्नाबाई उबाळे , अबोली उबाळे , श्रावणी भोसले , शौर्या अंकुश सुरवसे , नेहारिका सोनावळे , नेत्रांजली ठोकळे,
अपेक्षा ठोकळे , नाविण्या गायकवाड , सोम्या चौधरी , आरती चौधरी , अनिता तांबे , निकिता राव , मनिषा ओव्हाळ , आरती जाधव , आदी महिलावर्ग उपस्थित होते , तर यावेळी मैत्रेय बहुउद्देशीय सामाजिक संस्था , हालिवली कर्जतचे संस्थापक अध्यक्ष तथा बहुजन युथ पँथर रायगड जिल्हा सचिव व प्रवक्ते अंकुश रामराव सुरवसे , उपाध्यक्ष रमेश लादे , कार्याध्यक्ष संतोष सुरवसे, सचिव व प्रवक्ते शशिकांत उबाळे ,प्रमुख सल्लागार विशाल तांबे ,राजकुमार भंडारे , बाजीराव कांबळे , सहसचिव राजेश जाधव , खजिनदार गणेश गायकवाड, संपर्कप्रमुख मयूर गायकवाड , संघटक संकल्प रामदास निकम, मयुर मधुकर बडेकर , प्रसिद्धीप्रमुख विजय लक्ष्मण गायकवाड व सदस्य विजय कांबळे , गौरव वानखेडे , गोरख सुरवसे , गंगाराम तांबे ,जुगल चौधरी , संजय जाधव , अभिषेक मोरे , प्रशांत उबाळे , महेश भोसले , गणेश सुरवसे , दिपक सोनावणे , प्रथमेश घोलप , श्रेयश वाघमारे ,राम सुरवसे आदी उपस्थित होते .यावेळी सूत्रसंचालन संतोष सुरवसे यांनी केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page