if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांनी केले आमदारांच्या आरोपाचे खंडन व केला पलटवार !
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आम्ही कुणाचीही बदनामी केली नसून या मतदार संघातील नागरिकांना तुम्हीच सांगितले आहे की , ते आमचे कार्यकर्ते आहेत , असे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी एक दिवसांपूर्वी केलेल्या आरोपांचे खंडन करत , हेच ह्यांचे ” पगारी बॉडीगार्ड ” असल्याचा पलटवार करत माथेरान येथील ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रसाद सावंत यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपी असल्याचे पोलीस रेकॉर्ड दाखवत आज पत्रकार परिषदेत कथन केले.
शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत आज नेरळ येथील भर बाजारपेठेत मारहाण करत असल्याच्या ” व्हिडिओ व्हायरल ” प्रकरणी पत्रकार परिषदेत बोलत होते , ते पुढे म्हणाले की , आमदार महेंद्र थोरवे यांचे गुंड कार्यकर्त्यांचा दडपशाही – हुकूमशाही – ठोकशाही ने या मतदार संघात दहशत पसरविण्याचे कारस्थान असल्याचा आरोप केला . येथील नागरिक , अधिकारी वर्ग दहशतीखाली काम करत असून सामान्य नागरिकांना न्याय देण्याचे आवाहन त्यांनी प्रशासनाला केला .या विरोधात आम्ही पोलीस स्टेशनला पत्र देणार असल्याचे सांगितले.
येथील जनता सुज्ञ असून येणाऱ्या निवडणुकीत याचे चोख उत्तर देणार असून हि हुकुमशाही , ठोकशाही बंद करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगून आम्ही त्यांची कुठलीच बदनामी केली नसून ते कुणाचे कार्यकर्ते की पगारी बॉडीगार्ड आहेत , हे मतदार संघातील सर्व जनतेला ठावूक आहे , असे संतप्त मत व्यक्त केले . या पत्रकार परिषदेस शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांच्या समवेत कर्जत तालुका प्रमुख उत्तम दादा कोळंबे , तालुका संघटक बाबू घारे आदी पदाधिकारी उपस्थित होते , त्यांनी देखील या घडलेल्या घटनेबाबत मत व्यक्त केले.