भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष तयारीला लागला असून येथील जागा पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा कर्जतमध्ये शेळके मंगल कार्यालय येथे मंगळवार दिनांक १६ जुलै २०२४ रोजी ठीक ११ – ०० वाजता आयोजित केली असून शिवसेना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची मुलुख मैदानी तोफ धडाडणार असल्याने , ते कुणाचा समाचार घेणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे . या सभेच्या पूर्व तयारीसाठी सर्व कर्जत – खालापूर मतदार संघातील शिवसेना – युवासेना – महिला आघाडी पदाधिकारी यांची आढावा बैठक उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कर्जतमध्ये संपर्क कार्यालय ” शिवालय ” येथे पार पडली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांच्या समवेत कर्जत ता. प्रमुख उत्तम कोळंबे , खालापूर ता. प्रमुख एकनाथ पिंगळे , रियाझ शेठ बूबेरे , संपर्क प्रमुख भिवसेन बडेकर , संघटक बाबु घारे , मा. सभापती पंढरीनाथ राऊत , जेष्ठ नेते राजाराम शेळके ,संपर्क प्रमुख उमेश गावंड , माधव कोळंबे , महेश पाटील , ॲड.संपत हडप , संतोष देशमुख , विलास चालके , अशोक मरागजे , दिनेश घाडगे , बंडू क्षीरसागर , आवेश जुवारी , सुरेश गोमारे , अविनाश भासे , असीम बुबुरे , नितीन धूळे , विभाग प्रमुख बाजीराव दळवी , विलास सांगळे , पांडुरंग बागडे , कर्जत शहर प्रमुख निलेश घरत , महिला आघाडी संघटिका अनिता पाटील ,कर्जत ता. संघटिका करुणा बडेकर , सुविधा विचारे , शैला भगत , वैजयंता गायकवाड आदी प्रमुखासह मोठ्या संख्येने शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडी उपस्थित होते.
यावेळी उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांनी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा ” शिवसेनेचा भगवा ” फडकणार असून त्यासाठी आपण सर्वजण सज्ज झाले आहोत , विधानसभा निवडणुकीत समोरील उमेदवारांच्या तोडीस तोड आपण ही निवडणूक लढणार असल्याने आपआपसातील मतभेद बाजूला ठेवून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी एक दिलाने कामाला लागा , तर येत्या १६ जुलैला आपल्या नगरीत सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे येणार असल्याने त्यांचे ” धुवांधार ” विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी सर्वांना केले . कर्जत तालुका संघटक बाबू घारे यांनी , आपल्या पाठीशी शिवसेना नावाचं खूप मोठे व्यासपीठ असून पक्षप्रमुख उद्धव साहेब , आदित्य साहेब ठाकरे यांचे आशीर्वाद असुन पुढील काळात कोणत्याही अमिषाला बळी पडू नका , असे आवाहन करत , मी उद्धव साहेबांच्या पाठीशी ठाम राहिल्याने माझ्यावर अनेक दबाव आणले पण मी मागे हटलो नाही, आणि यापुढे हटणार नाही , असे जोश पूर्ण मत व्यक्त केले . तसेच आवेश जुवारी यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, आपल्या पक्षाची काळजी घ्या कारण पुढील काळ धोक्याचा आहे , आमिषाचे पाऊस सुरू होणार आहे , त्या पावसात न भिजता निष्ठावंत म्हणून राहा , तरच आयुष्यात मनाला समाधान मिळेल , तसेच खालापूर तालुका संपर्कप्रमुख उमेश गावंड म्हणाले की , शिवसेना पक्षाच्या पडत्या काळात आपण उद्धव साहेबांच्या पाठीशी ठाम राहिल्यानेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात भरघोस मताधिक्य मिळाले आहे , हे मताधिक्य आपल्याला विधानसभा निवडणुकीची ” विजयाची नांदी ” आहे , यावर प्रकाश टाकला.
कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे म्हणाले की, कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ हा आपला ” बालेकिल्ला ” आहे व पुढील काळातही तो आपला बालेकिल्ला राहणार आहे, त्यामुळे येत्या दोन महिन्यात सर्वांनी मोठे परिश्रम घेत उद्धव साहेबांना आपल्या हक्काचा आमदार निवडून देत त्यांचे हात बळकट करा , असे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले . तर खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळेनी आपल्या मनोगतातून म्हणाले की, सर्व शिवसैनिक – युवासैनिकांनी व महिला आघाडीने पक्ष बांधणीवर भर देत पक्ष संघटना आधी बळकट करा , तर आपल्या काही समस्या असल्यास पक्षातील वरिष्ठांसमोर मांडल्यास त्या सोडवण्यासाठी वरिष्ठ कटीबद्ध राहतील, सर्वांनी पक्ष संघटनेचे ध्येयधोरण समजून घेत पक्ष संघटनेशी एकनिष्ठ राहिल्याने पक्ष संघटना आपल्या कार्याची दखल घेत आपल्याला योग्य तो न्याय देईल , असे म्हणाले.
कर्जत – खालापूर विधानसभेच्या होणाऱ्या आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने खूप मोठी मोर्चेबांधणी केली आहे , गाव तिथे शाखा व बूथ बांधणी वर भर दिला आहे . अत्यंत सुनियोजित पद्धतीने पक्ष संघटना वाढीवर भर देण्याचे काम सुरू असल्याचे पहायला मिळत आहे . अनेकांचा पक्ष प्रवेशाचा ओघ शिवसेना पक्षात सुरू असताना पक्ष संघटना अधिक बळकट व्हावी , यासाठी १६ जुलै रोजी कर्जत मध्ये शिवसेनेची युवा तोफ गरजणार आहे. या सभेत शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे काय मार्गदर्शन करणार ? कुणाचा समाचार घेणार ? पुढील रणनिती काय असेल ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून असल्याने त्यांच्या या सभेला अभूतपूर्व संख्येने शिवसेना – युवासेना – महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे , असे आवाहन करत यासाठी चक्रव्यूह रचना उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांनी आखली असून हि सभा चांगलीच गाजणार असल्याचे चित्र येथे पहाण्यास मिळणार आहे .