भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील मौजे खांडपे ते सांडशी या प्रमुख रस्त्याचे बंद असलेले काम तात्काळ सुरू करणेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा मा. उपाध्यक्ष राजिप श्री सुधाकरशेठ घारे यांच्या नेतृत्वाखाली आज नवीन वर्षाच्या दिवशीच १ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वा . तिवणे येथे रस्ता रोको जन आंदोलन करून ठेकेदाराचा व प्रशासनाचा तीव्र संताप व्यक्त करून रस्त्याचे काम त्वरित सुरू करून १५ दिवसांत पूर्ण न केल्यास दि.७ जानेवारी २०२३ रोजी आमरण उपोषण करण्याचा ईशारा दिला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच, उपसरपंच व सर्व सन्माननीय सदस्य, ग्रामपंचायत हद्दीतील प्रमुख पदाधिकारी, मान्यवर व कार्यकर्ते तसेच प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होती.मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सन २०१९-२० मौजे खांडपे, तिवणे व सांडशी रस्ता करणे, रक्कम रु. २६२.३४ लक्ष काम मंजूर करण्यात आले , सदरील कामाचा ठेका नवी मुंबई येथील श्री . सिद्धीविनायक कन्स्ट्रक्शन कंपनीने १२% कमी दराने दिनांक ४ जानेवारी २०२१ रोजी देण्यात आला. सदरील कामाचा ठेका मिळविल्यानंतर काम तत्काळ सुरू करणे गरजेचे होते , परंतु ठेकेदार व प्रशासन यांच्या मनमानी कारभारामुळे काम उशीरा म्हणजेच पावसाळ्यापूर्वी करण्यात आले परंतु काम अपूर्ण ठेवून ठेकेदार व प्रशासन यांच्या दिरंगाईमुले संपूर्ण पावसाळ्यात नागरिकांना पूर्णपणे खराब रस्त्याच्या चिखलातून मार्ग काढण्याचा सामना करावा लागला.
पावसाळ्यात अनेक अपघात होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करायला लागला , यावर सुधाकरशेठ घारे यांनी प्रकाश टाकला , तर आता पावसाळा संपला तरी रस्त्याचे काम ठेकेदारकडून आजपर्यंत पुन्हा सुरू करण्यात आले नाही. साकव असताना बेकायदेशीर मो-यांचे काम केले आहे , त्या मोऱ्याहि खचल्या आहेत , तर रस्त्यावर सर्वत्र खडी पसरली आहे.प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता नक्की कामाचे काय चाललंय हे माहीत नाही ,अशी बेजबाबदारपणाची उत्तरे मिळत आहेत .याबाबत सुधाकरशेठ घारे यांनी मा.मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांसहित अनेकांना पत्रव्यवहार केलेला आहे.
कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील गावे जोडणाऱ्या रस्त्यांची कामे व्हावी म्हणून या श्री सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन कंपनीस बोर्ले – जिते – कुंभे रस्ता रक्कम रुपये २३३ .६० , चिंचवली ते सालवड नसरापूर रक्कम रुपये १८९ .३३ , खांडपे – तिवणे ते सांडशी रस्ता २६२ . ३४ बेडीस गाव रस्ता ७१ लाख ३६ हजार कोशाणे – वावे रस्ता ३ करोड ४८ लाख ४२ हजार याप्रमाणे पाच कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.हि सर्वच कामे आजमितीला अर्धवट अवस्थेत आहेत.
या अडीच वर्षांमध्ये ही कामे होणे गरजेचे असतानाही नवी मुंबई येथील श्री सिद्धिविनायक कंट्रक्शन कंपनीने १२ टक्के कमी दराने घेतलेली कामे प्रशासकीय अधिकारी यांनी ठेकेदारांची बीड कॅपॅसिटी व बिल ऑफ कॉन्टिटी तपासण्यात आली आहे का ? तसेच सिद्धिविनायक कंट्रक्शन कंपनी यांस कडून करण्यात आलेल्या कामांची वर्णन व वर्क इन हॅन्ड केल्याचे दाखले दिले आहेत अगर कसे ? तसेच ४ जानेवारी २०२१ रोजी सिद्धिविनायक कंट्रक्शन कंपनीला कामाचे वर्क ऑर्डर देऊन आज पर्यंत खांडपे – तिवणे – सांडशी काम अर्धवट अवस्थेत का ? तर या कामांची सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे चौकशी करावी व हे काम १५ दिवसांत पूर्ण करावे , अन्यथा ७ जानेवारी २०२३ पासून सुस्त प्रशासन व मुजोर ठेकेदारांच्या गलथान कारभारा विरोधात आमरण उपोषणाचा संतप्त ईशारा सुधाकरशेठ परशुराम घारे ( मा.उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण – क्रीडा व आरोग्य समिती राजिप ) यांनी दिला आहे.