if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आपल्या चेहऱ्यावर ” शांत स्मित हास्य ” देत संयमी वकृत्वाने व आजपर्यंत कार्याचा डोंगर उभा करून सर्व शिवसैनिकांना पडत्या काळात नेतृत्व देवून ” शिव बंधनात ” बांधून वज्र मुठी प्रमाणे एकसंघ ठेवणारे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख तथा कर्जत नगर परिषदेचे ” हॅट्रिक ” साधून मा. गटनेते अशी विविध पदे सांभाळून पक्षाला ” नवसंजीवनी ” देणारे नितीन दादा सावंत यांचे नेतृत्व राजकीय पटलावर ” युक्ती आणि शक्तीच धगधगत अग्निकुंड ” च म्हणावे लागेल.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचाराने घडलेले नितीन दादा सावंत ऐन तारुण्यात ” शिवसेना ” सारख्या धगधगत्या अग्निकुंडात उडी घेवून त्यांनी सामाजिक कार्याची सुरुवात केली . अडल्या नडल्यांना उपयोगी पडत ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हा शिवसेना पक्षाचा ” महामंत्र ” घेवून त्यांचे कार्य उदयास आले . त्यांच्या या कार्याची पोच पावती म्हणून कर्जत नगर परिषदेच्या २००९ साली त्यांना कोतवाल नगर – मुद्रे परिसरातून शिवसेनेने उमेदवारी दिली . त्यांच्या कार्याचा वाढता आलेख , मित्र परिवार , कडवे शिवसैनिक व बहुसंख्य नागरिकांनी त्यांना निवडून दिले . पालिकेत सत्ता असो वा नसो त्यांचा ” जनता दरबार ” नेहमीच भरलेला असायचा . त्यांच्याकडे समस्या घेवून आलेल्या नागरिकांचे काम १०० टक्के हमी देवून ते पूर्ण करत असत . म्हणूनच असा दमदार लोकप्रतिनिधी पालिकेत पुन्हा असावा , यासाठी नागरिकांनी त्यांना पुन्हा एकदा सन २०१४ साली निवडून दिले . त्यावेळी देखील त्यांचे कार्य सर्वदूर पसरून त्यांची प्रतिमा नागरिकांच्या मनामनात बसली . सन २०१९ साली ते दहीवली – बामचा मळा येथून उभे राहिले . ” आव्हान स्वीकारणारे ” त्यांचे नेतृत्व असल्याने आपला प्रभाग नसताना देखील बहुमताने पुन्हा एकदा निवडून येवून त्यांनी विजयाची सलग हॅट्रिक केली.
पालिकेत गटनेते होवून त्यांनी विकासाचे चांगले विषय घेवून ते मंजुरी मिळवून सर्वच प्रभागात त्यांचे विकास कार्य आजही पहाण्यास मिळत आहेत . त्यांच्या कार्यकिर्दित पालिकेवर २ वेळा शिवसेनेचा नगराध्यक्ष विराजमान झाला , यांत त्यांचा खूप मोठा वाटा आहे . तर येथील विधानसभेत शिवसेनेचा ” बालेकिल्ला ” अबाधित ठेवण्यास त्यांचा खारीचा वाटा आहे.अखंड असलेली शिवसेना फुटल्यावर कर्जत – खालापूर मतदार संघात प्रथम त्यांनी पुढाकार घेवून शिवसैनिकांना आधार देत वज्र मुठीप्रमाने एकत्रित ठेवले , हे त्यांचे कार्य ” ” ढाण्या वाघाला ” शोभेल असे असल्याने ” मातोश्री ” वरून पक्ष प्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर उपजिल्हा प्रमुखाची जबाबदारी सोपवली.
आज जे काही शिवसेनेला संजीवनी देण्याचे कार्य केले , ते त्यांनी योग्य पद्धतीने लिलया सांभाळले असून तरुणांची जबरदस्त फौज त्यांनी तयार केली आहे . तरुणांना रोजगार मेळावा , कब्बडी स्पर्धा , क्रिकेट सामने , बैल गाडा शर्यती , महिला भगिनींना हळदी कुंकू समारंभ , पैठणी साडी वाटप कार्यक्रम , रक्तदान शिबिर , आरोग्य शिबीर , शासकीय दाखले शिबिर , ग्रामीण भागात पाणी वाटप , अन्न धान्य वाटप , अशी विविध सामाजिक कार्यक्रमातून त्यांचे नेतृत्व राजकीय पटलावर चमकत असून या मतदार संघाचे पुढील विधानसभेचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळून ते ” आमदार ” होणार , असेच चित्र सर्वत्र निर्माण झाले असून मातोश्री ने देखील त्यांच्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी तुम्हालाच मिळणार , असा ” हिरवा सिग्नल ” दिलेला आहे.
आजपर्यंतच्या त्यांच्या विजयी होण्याच्या विक्रमाने ते विधानसभेला तमाम शिवसैनिक – युवा सेना – महिला आघाडी – मित्र परिवार व अनेक नागरिकांच्या आशीर्वादाने बाजी मारून ” मशाल ” पेटवून विजयी होतील व या मतदार संघाचे ” आमदार ” होतील , यांत शंकाच नसेल . आजच्या ३ ऑगस्ट २०२४ या त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या सर्व ईच्छा पुर्ण होवो , हिच ईश्वरचरणी प्रार्थना , व जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !