Friday, October 18, 2024
Homeपुणेमावळराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये होणार..

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये होणार..

मावळ (प्रतिनिधी):कोरोनामुळे आणि इतर अनेक कारणांमुळे तीन वर्षांच्या विलंबानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये या वर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने मतदार यादीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान होणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 5 जुलै रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य विधानमंडळाच्या मतदार याद्या वापरण्याचा विशेष उल्लेख आहे.अधिसूचनेत म्हटले आहे की, “1 जुलै 2023 रोजी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्या महानगरपालिका,नगरपरिषदा, नगर पंचायत, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरल्या जातील. किंवा पोटनिवडणूक सप्टेंबर 2023 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के.सूर्यकृष्णमूर्ती यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व प्रलंबित निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये घेतल्या जातील, याची पुष्टी यामधून देण्यात आली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page