Thursday, July 3, 2025
Homeपुणेवडगावरामदास वाडेकर यांची मावळ तालुका राष्ट्रवादी पक्ष संघटन सरचिटणीसपदी निवड...

रामदास वाडेकर यांची मावळ तालुका राष्ट्रवादी पक्ष संघटन सरचिटणीसपदी निवड…

वडगाव मावळ : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटन सरचिटणीसपदी रामदास जाखोबा वाडेकर यांची निवड करण्यात आली . त्यांना मावळचे आमदार सुनिल शेळके व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले .

यावेळी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते राज खांडभोर , आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रूपेश घोजगे , सरचिटणीस संतोष नरवडे , माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले , माजी सरपंच दत्तात्रय पडवळ , अनिल मालपोटे , सरचिटणीस महेश बेंजामिन उपस्थित होते .

रामदास वाडेकर हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात . वाडेकर यांनी यापूर्वी पक्ष संघटनेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष 2003, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस 2009 , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख 2014 असे विविध पदावर काम केले आहे .

- Advertisment -

You cannot copy content of this page