Wednesday, January 15, 2025
Homeपुणेमावळराष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुका सरचिटणीस पदाची धुरा सौ. प्रिया गणेश मोरे यांच्याकडे…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुका सरचिटणीस पदाची धुरा सौ. प्रिया गणेश मोरे यांच्याकडे…

कार्ला (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ तालुका महिला सरचिटणीस पदी सौ. प्रिया गणेश मोरे (शिलाटणे, मावळ) यांची नियुक्ती करण्यात आली. आज शनिवार दि.19 रोजी ही निवड जाहीर करण्यात आली.आमदार सुनील (आण्णा) शेळके यांचे कट्टर समर्थक गणेश मोरे यांच्या त्या पत्नी आहेत.
सौ. प्रिया मोरे यांच्यावर राष्ट्रवादी पक्षाच्या तालुका सरचिटणीस पदाची जबाबदारी देत त्यांचे पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्ष श्रेष्ठिना अभिप्रेत असणारी पक्ष संघटना बांधण्यासाठी,पक्षाची ध्येय -धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य राहील अशी अपेक्षा व्यक्त करत.
राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार , राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजियाताई खान,खासदार सुप्रियाताई सुळे,ना.अजितदादा पवार,ना.जयंतराव पाटील, रुपालीताई चाकणकर व मावळचे आमदार सुनिल ( आण्णा ) शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्षा सौ. दिपाली संदीप गराडे, कार्याध्यक्षा सौ. कल्याणी विजय काजळे यांच्या हस्ते निवडीचे पत्रक देण्यात आले.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून सौ प्रिया गणेश मोरे यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी सर्व मावळ तालुका महिला कार्यकर्त्या मोठया संख्येने उपस्थित होत्या.
- Advertisment -

You cannot copy content of this page