Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडरुपारेल कॉलेजचे प्रतिनिधित्व करून प्रथम क्रमांक पटकावणारा " भिसेगावचा तबलापट्टू " यश...

रुपारेल कॉलेजचे प्रतिनिधित्व करून प्रथम क्रमांक पटकावणारा ” भिसेगावचा तबलापट्टू ” यश शरद हजारे याचे सर्वत्र कौतुक !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) रुपारेल कॉलेज – मुंबई येथे झालेल्या ” युथ फेस्टिवल ” च्या झोनल राऊंड मध्ये ” तबला वाजवून ” सर्वांना मंत्रमुग्ध करणारा व प्रथम क्रमांकाने फायनल साठी निवड झालेला कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव येथे वास्तव्यास असलेला तर गुरुवर्य विवेक दत्तात्रय भागवत यांच्याकडे तालीम घेवून सर्व कुशल ठरलेला ” यश शरद हजारे ” याचे सर्वत्र कौतुक होत असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . रूपारेल कॉलेज सारख्या प्रतिष्ठित कॉलेजचे प्रतिनिधित्व करून मुंबई झोन सारख्या अतिशय चुरस असलेल्या झोन मधून अंतिम फेरीसाठी निवड होणे , हे नक्कीच गौरवास्पद असून माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे , असे मत यश हजारे याचे ” गुरुवर्य – विवेक भागवत ” यांनी व्यक्त केले.

मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या ” युवा महोत्सवात ” मुंबई विभाग विभागातून २० ते २२ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये मुंबई विभागातील प्रतिष्ठित महाविद्यालय ” डी. जी. रुपारेल कॉलेज ” याचे यश शरद हजारे हा प्रतिनिधित्व करत होता. यामध्ये ” classical Instru meneral pereussion solo ” या स्पर्धेमध्ये डी. जी. रुपारेल महाविद्यालयाला पहिला क्रमांक मिळाला , तसेच यश हजारे याची फायनल राऊंडसाठी निवड झाली आहे.

लहान पणापासून संगीत क्षेत्राची आवड असणाऱ्या यश हा संगीत क्षेत्रात रायगड जिल्ह्या बरोबरच कर्जत तालुक्यात सर्वश्रेष्ठ व सर्व वाद्य वाजविण्यात ” ऑलराऊंडर ” आहे .बडेकर कॉलेज ठाणे , अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ – मुंबई , त्याचप्रमाणे कर्जत तालुका , रायगड जिल्ह्यात देखील त्याला अनेक मानांकन मिळाले आहेत . अनेक चित्रपट सृष्टीतील सेलिब्रिटी सोबत त्याचे कार्यक्रम झाले आहेत. माझ्या विजयाचे श्रेय माझे गुरुवर्य विवेकजी भागवत , आई – आशा व वडिल – शरद हजारे हे असून त्यांच्या अथक प्रयत्नामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे.
अजून पुढे खुप काही गोष्टी शिकायच्या असून महाराष्ट्रातील नामवंत ” तबलापट्टू ” म्हणून नाव कमावायच आहे . यासाठी भिसेगाव व कर्जतकर नागरिकांचे प्रेम व आशीर्वाद सदैव माझ्यावर राहोत , हिच भगवंत चरणी प्रार्थना करतो , असे भावनिक मत यश शरद हजारे याने व्यक्त केले .कर्जत – खालापुरचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी त्याचे विशेष कौतुक केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page