लोणावळा : मुंबई पुणे लोहमार्गावरील महत्वाचे ठिकाण असलेल्या लोणावळा रेल्वे स्थानकातील एक्सप्रेस गाड्यांचा थांबा बंद करत तो खंडाळा येथे हालविण्यात आला आहे . रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाश्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत असल्याने एक्सप्रेस गाड्यांचा लोणावळा रेल्वे स्थानकावरील थांबा तात्काळ पुर्ववत करावा अशी मागणी लोणावळा शहर काँग्रेसच्या वतीने मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अमितकुमार लव्होटी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यासोबतच लोणावळा पुणे लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्या पुर्ण क्षमतेने सुरु करा . डेक्कन क्विन ( 12123/12124 ) लोणावळा पासधारक भोगी सुरु करा , पनवेल नवी मुंबई भागात कामासाठी जाणाऱ्या प्रवाश्यांसाठी आवश्यक प्रगती एक्सप्रेस व सह्याद्री एक्सप्रेस गाड्या पुर्ववत सुरु करा , एक्सप्रेस गाड्यामध्ये जनरल तिकिट सेवा सुरु करा अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पुर्ववत सुरु करा , एक्सप्रेस गाड्यामध्ये जनरल तिकिट सेवा सुरु करा अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत . महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस निखिल कविश्वर , माजी नगरसेवक व लोणावळा शहर काँग्रेसचे निरिक्षक नासिर शेख , मावळ तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष फिरोज बागवान , सामाजिक कार्यकर्ते शब्बीरभाई शेख , चंद्रकांत गवळी , सनी गवळी आदी उपस्थित होते .
लोणावळा रेल्वे स्थानकातील एक्सप्रेस गाड्यांचा थांबा बंद केल्याने लोणावळा शहरातील तसेच देहूरोड पासून लोणावळ्यापर्यतच्या प्रवाश्यांची गैरसोय झाली आहे . लोणावळ्यात लोकलने येऊन प्रवाश्यांना एक्सप्रेस गाडीत पकडता येत होती . आता मात्र त्यांना खंडाळ्यात जावे लागत आहे तसेच खंडाळा रेल्वे स्थानकात उतरून पुन्हा लोकल पकडण्यासाठी लोणावळ्यात यावे लागत असल्याने वेळेचा व पैश्यांचा अपव्यय वाढला असल्याने प्रवाशी संताप व्यक्त करत आहेत.रेल्वे प्रवाशांच्या या मागण्यांचा येत्या आठ दिवसात सकारात्मक विचार न झाल्यास लोणावळा ते कर्जत दरम्यान प्रवाशी रास्तो रोको आंदोलन करतील असा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.