Tuesday, August 5, 2025
Homeपुणेवडगावलोकप्रिय आमदार सुनील शेळके यांचा वडगांव नगरीत भव्य सत्कार सोहळा संपन्न...

लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांचा वडगांव नगरीत भव्य सत्कार सोहळा संपन्न…

मावळ(प्रतिनिधी): वडगाव नगरीत आमदार सुनिल आण्णा शेळके यांचा नागरी सत्कार सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला.
वडगांव नगरपंचायतचे नगराध्यक्ष मयुर ढोरे मित्रपरिवार, मोरया प्रतिष्ठान व वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वडगाव शहरामध्ये मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनिल शेळके यांचा वाढदिवस विविध स्पर्धात्मक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.यात प्रामुख्याने महिला भगिनींसाठी घेण्यात आलेल्या पाक कला स्पर्धेत सुमारे 635 महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.
तसेच विद्यार्थी वर्गांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धेत सुमारे 1525 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर मॅरेथॉन स्पर्धेत जवळपास 700 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. तर वारकरी संप्रदायातील नागरिकांसाठी मोरया प्रतिष्ठान व विठ्ठल परिवार मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मावळ तालुक्यातील सुमारे 150 पेक्षा अधिक भजनी मंडळे सहभागी झाली होती.
वडगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देणाऱ्या कार्यसम्राट आमदार सुनील शेळके यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य नागरी सत्कार कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय निलेश लंके उपस्थित होते. तसेच यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांनी आमदार सुनिल आण्णा शेळके यांचे कौतुक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार सुनिल शेळके, मा महसूल राज्यमंत्री मदन बाफना, सहकारमहर्षी माऊली दाभाडे, कृषी व पशुसंवर्धन समिती मा. सभापती बाबुराव वायकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, काँग्रेसचे मा तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, नगराध्यक्ष मयुर ढोरे, जेष्ठ नेते मंगेश ढोरे, तज्ञ संचालक सुभाष जाधव, जेष्ठ नेते सुनिल चव्हाण, कुलस्वामिनी महिला मंच मावळ अध्यक्षा सारिका शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस महिला मावळ तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, मा उपसरपंच तुकाराम ढोरे, युवक अध्यक्ष किशोर सातकर, वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, नगरसेवक राहुल ढोरे, सुनील ढोरे, चंद्रजीत वाघमारे, गणेश म्हाळसकर, पुनम जाधव, शारदा ढोरे, प्रमिला बाफना, माया चव्हाण, पूजा वहिले, सायली म्हाळसकर, ओबीसी सेल अध्यक्ष अतुल राऊत, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष अतुल वायकर, कार्याध्यक्ष सुरेश जांभुळकर, अल्पसंख्याक सेल वडगाव शहराध्यक्ष मजहर शेख, मंगेश खैरे, विशाल वहिले, सिद्धेश ढोरे, गणेश जाधव, शरद ढोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मोरया महिला प्रतिष्ठान संचालिका, मोरया मित्र मंडळ, मोरया ढोल पथकातील सदस्य, हितचिंतक मित्रपरिवार आणि वडगाव शहरातील नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम सरतेशेवटी नगराध्यक्ष मयूर ढोरे आणि मोरया प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page