Thursday, December 26, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा ग्रामीण पोलीस आयोजीत तक्रार निवारण दिनी एकूण 47 अर्ज निकाली….

लोणावळा ग्रामीण पोलीस आयोजीत तक्रार निवारण दिनी एकूण 47 अर्ज निकाली….

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आज तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी 26 वरिष्ठ अर्ज व 21 आवक अर्ज असे एकूण 47 अर्ज निकाली काढण्यात आले.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या सुचनेनुसार अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे व सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार दि .19 रोजी सकाळी 11:00 वा . लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले.यापुर्वी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये अर्जदार व गैरअर्जदार यांच्याशी संवाद साधून 26 वरिष्ठ अर्ज व 21 आवक अर्ज असे एकूण 47 अर्ज निकाली काढण्यात आले.
लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने, , सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ , पोलीस उपनिरीक्षक जाधव व पोलीस अंमलदार यांच्या उपस्थितीत हा तक्रार निवारण दिन संपन्न झाला.
- Advertisment -

You cannot copy content of this page