लोणावळा : ( श्रावणी कामत) लोणावळा ५ जून, २०२४: सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आदेशानुसार संत निरंकारी मिशनच्या सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन आणि लोणावळा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बीट प्लास्टिक पोल्युशन’ या विषयावर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त व्यापक वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी, पन्हाळा, आणि सोमेश्वर या प्रमुख पर्वतीय पर्यटन स्थळांचा समावेश होता. या अभियानासाठी संत निरंकारी मंडल दिल्लीचे अकाउंट मेम्बर इंचार्ज श्री. जोगिंदर मनचंदा, लोणावळा नगरपरिषद उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी, शहर समन्वयक विवेक फडतडे, पुणे झोनल इंचार्ज श्री. ताराचंद करमचंदानी, तसेच पालिकेचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
सकाळी ७:३० ते १२:३० या वेळेत लोणावळा आणि खंडाळा येथील मुंबई-पुणे महामार्गाचे दोन्ही बाजूचे रस्ते, खंडाळा ते अमृतांजन पॉईंट, वलवन तळे, कावेरी फार्म, नागरगाव, लोहगड उद्यान, रायवूड ते लोणावळा डॅम गेट, राजमाची, तुंगार्ली चौक ते ग्रामीण पोलीस स्टेशन, नगरपरिषद कार्यालय, मावळा पुतळा या ठिकाणी स्वयंसेवक, सेवादल सदस्य, भक्तगण आणि लोणावळा नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी संपूर्ण परिसर स्वच्छ केला. तसेच १०० हुन अधिक झाडे लावण्यात आली. पद रॅली व पथनाट्ये सादर करून स्वयंसेवकांनी हातामध्ये पर्यावरण रक्षणविषयक घोषणाफलक, बॅनर्स उंचावून मानवी साखळी निर्माण केली आणि नागरिकांमध्ये वायू प्रदूषण रोखण्याविषयी जागृती निर्माण केली.
कार्यक्रम समाप्तीनंतर अभियानाद्वारे दिलेल्या स्वच्छता संदेशाच्या प्रती जागरूक राहण्याचा संकल्प सर्वांनी केला. श्री. किशनलाल अडवाणी आणि अवनीत तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान संपन्न झाले. संत निरंकारी मंडळाचे श्री. महादेव सुतार यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.