लोणावळा :नगरपरिषद हद्दीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे काम पूर्ण झालेल्या 54 लाभार्थ्यांना चावीचे वितरण व कचरा संकलन करण्यासाठी दोन इलेक्ट्रिक घंटागाड्यांचे लोकार्पण आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
ज्या भागात मोठ्या घंटागाड्या जात नाही,तेथे या गाड्या उपयुक्त ठरणार आहेत. लोणावळा नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी, शिपाई कर्मचाऱ्यांकरिता कल्याणकारी अभिनव योजनेच्या माध्यमातून दहा लक्ष रुपय अपघात विमा कवचचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. अशा प्रकारचा विमा काढणारी जिल्ह्यातील पहिली नगरपरिषद लोणावळा असणार आहे. ‘डे राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान’ अंतर्गत दारिद्रय रेषेखालील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी वैयक्तिक कर्ज सहाय्य उपलब्ध करून देण्यात आलेल्या लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले.
यावेळी लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष जीवन गायकवाड, महिला काँग्रेस शहराध्यक्षा मंजुश्रीताई वाघ, ज्येष्ठ नेते विलास बडेकर, नगरसेविका आरोही तळेगावकर, उद्योजक मुकेश परमार, नारायण पाळेकर, बाळासाहेब फाटक, राजू बोराटी, संयोगीता साबळे, धनंजय काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.