लोणावळा दि. 1: उत्तर प्रदेश येथील हथरस येथे दलित मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व अमानुष अत्याचाराच्या धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ लोणावळा शहर आरपीआय च्या वतीने लोणावळा शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी हे निवेदन स्वीकारले असून. हा खटला जलद गतीने चालविण्यात यावा, ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागण्या आरपीआय पुणे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे व पुणे जिल्हा महिला अध्यक्षा यमुना साळवे यांनी निवेदनामार्फत केल्या आहेत. त्यावेळी आरपीआय पुणे जिल्हा उपाध्यक्षा मालन बनसोडे, लोणावळा शहर अध्यक्षा उषा जाधव, मावळ तालुका उपाध्यक्षा शोभना गायकवाड आदी उपस्थित होते.