Thursday, July 3, 2025
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात 2 वर्षीय बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न फसला, आरोपीला नागरिकांनी पकडले..

लोणावळ्यात 2 वर्षीय बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न फसला, आरोपीला नागरिकांनी पकडले..

लोणावळा: शहरातील गावठाण भागात 2 वर्षीय बालिकेचे अपहरण करण्याचा प्रयत्न एका इसमाने केला. मात्र, मुलीच्या पालकांनी केलेल्या आरडाओरडामुळे सतर्क नागरिकांनी त्याला पकडून लोणावळा शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना रविवारी, 12 जानेवारी रोजी दुपारी सुमारे 1.20 वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बालिका घरात खेळत असताना आरोपीने घरात शिरून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पालकांच्या जागरूकतेमुळे नागरिकांनी त्वरीत हस्तक्षेप करत आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात आरोपी अमर त्रिपाठी (पूर्ण नाव व पत्ता अद्याप उपलब्ध नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
शहरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page