if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा : लोणावळा हद्दीतील अनेक गुन्हे उघडकीस आणून लोणावळा शहर पोलिसांनी गुन्हेगारांवर चांगलीच वचक निर्माण केली आहे. हद्दीतील अनेक गुन्ह्यांचा पर्दाफाश लोणावळा पोलिसांनी केला आहे. त्याचप्रमाणे दि. 25/8/2020 रोजी रात्री 8:30 वा. च्या सुमारास पांगोळी कैवल्यधाम येथील एका पायी चालणाऱ्या व्यक्तीस दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी अडवून त्यांच्या कडील मोबाईल हिसकावून पळून गेल्याची घटना घडली होती. त्यासंदर्भात पंकज दत्त शर्मा ( वय 38, रा. कैवल्यधाम लोणावळा ) यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती.
सदरच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वरिष्ठ नागरिक सायंकाळच्या वेळी घराबाहेर पडण्यास कातरत होते. एकीकडे नागरिकांमध्ये पसरलेली भामट्या चोरांची भीती आणि त्याच अनुषंगाने लोणावळा पोलिसांचा तपास.ह्या जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांचा पर्दाफाश करणे हे ध्येर्य समोर ठेऊन लोणावळा गुन्हे शोध पथकाने त्या दृष्टिकोनातून आपला तपास सुरु केला होता.
अन्तोतन्त तपास करूनही आरोपींचे कुठलेच धागे दोरे पोलिसांच्या हाती लागेना, तरीही धीर न सोडता लोणावळा गुन्हे शोध पथकाने आपल्या पूर्ण गुप्त यंत्रणा कामी लावून स्वतः वेषांतर करून गुन्हेगारांच्या शोधात असताना गुप्तचर व पोलीस मित्रांद्वारे माहिती मिळाली असता लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे दहा दिवस पाळत ठेऊन, गुन्ह्यात चोरी झालेल्या मोबाईलचा तांत्रिक पद्धतीने तपास करून सदर गुन्ह्यात तीन अल्पवयीन बालक सामील असल्याचे पोलीस तपासात समोर आले. मिळालेल्या तीनही अल्पवयीन बालकांचा गुन्हे अभिलेख तपासून पाहिला असता त्यातील एकावर लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गु. र. नं. 306/2020, भा. द. वि. कलम 454, 457, 380, 34 व गु. र. नं. 418/2020, भा. द. वि. कलम 454457, 380, 34 अन्वये घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
लोणावळा उपविभागीय अधिकारी, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, गुन्हे शोध पथकातील वैभव सुरवसे ( पो. ना. ), नितीन सूर्यवंशी ( पो. ना. ), मनोज मोरे ( पो. कॉ. ), अजीज मेस्त्री ( पो. कॉ. ), पवन कराड ( पो. कॉ. ), राहुल खैरे ( पो. कॉ. ), राजेंद्र मदने ( पो. कॉ. ) यांच्या गुन्हे शोध व प्रकटीकरण पथकाने ह्या गुन्हेगारांचा पर्दाफाश केला असून . गुन्ह्याचा पुढील तपास पो. उपनिरीक्षक बळीराम सांगळे हे करत आहे.