लोणावळा (प्रतिनिधी): मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर नारायणी धाम पोलीस चौकी समोरील वलवण फाट्याजवळ आज सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास एसटी महामंडळाची बस व दुचाकी गाडी यांच्यात अपघात झाला.
या अपघातात दुचाकीवरील तीन महिला जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी लोणावळ्यातील परमार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी एका महिलेच्या पायाला गंभीर मार लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदरची बस क्र. MH 20 BL 3330 ही परळ डेपोची बस पिंपळगावरोठा येथून कुर्ल्याकडे लोणावळ्याच्या दिशेने निघाली होती त्यावेळी दुचाकी गाडी समोरुन येत होती.
जखमी महिला ह्या नांगरगाव भागातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती.