दि. 10 जुलै रोजी लोणावळ्यात एका दिवसात तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून लोणावळ्यातील कोरोना बाधितांची संख्या पंधरावर पोहचली आहे. दिवसानुदिवस लोणावळा शहर वा परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे.त्याच अनुषंगाने लोणावळा शहरात पुन्हा लॉकडाऊन होणे गरजेचे आहे.
लॉकडाऊन खुलताच लोणावळ्यामध्ये बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढली असता जिल्हाधिकारी पुणे व तहसीलदार मावळ यांनी मावळातील पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद केली आहेत. त्यासंदर्भात लोणावळ्यात नगरपरिषद व लोणावळा पोलीस यांचा चोख बंदोबस्तही आहे. तरीसुद्धा काही पर्यटक फसवेगीरी करून शहरात घुसत आहेत. पोलिसांनी दिलेल्या सूचना डावलून लोणावळ्यात शिरकाव करणाऱ्या पर्यटकांवर लोणावळा शहर पोलिसांनी व ग्रामीण पोलिसांनी बऱ्याच प्रमाणात गुन्हे देखील दाखल केले आहेत.
परंतु लॉकडाऊन काळात पूर्णतः घरात बसून राहिलेले नागरिक लॉकडाऊन खुलण्याची वाट पाहत असताना अचानक खुलणारा लॉकडाऊन आणि त्याच बरोबर पावसाळा आल्याने शहरातील नागरिकांनी बाहेर कामासाठी अथवा आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी धाव घेतली आणि मुंबई पुण्यातील नागरिक फिरण्यासाठी लोणावळ्याला येऊन गर्दी करू लागल्याने आणि मावळ तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी पुणे आणि तहसीलदार मावळ यांनी मावळातील सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद केली आहेत. आणि लोणावळा नगरपरिषदेणे सुद्धा कोरोनावर मात करण्याच्या उपाययोजना राबविल्या आहेत.
परंतु लोणावळ्यातील नागरिकांनी काटेकोरपणे शासनाच्या सूचनांचे पालन नकेल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यास लोणावळा शहरात पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांनी शासनाच्या सूचनांचे पालन करण्यास आपली जबाबदारी समजून आपल्या शहराला कोरोना मुक्त बनविण्यासाठी शासनास सहकार्य करावे.