Friday, September 20, 2024
Homeपुणेवडगाववडगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस संभाषण शिबिराचे आयोजन...

वडगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस संभाषण शिबिराचे आयोजन…

वडगाव मावळ : आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे यांच्या संकल्पनेतून वडगांव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सेल, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी दहा दिवसीय संभाषण, कला, कौशल्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

वडगाव शहरातील शासकीय विश्रामगृह येथे संभाषण शिबीराचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, नगरसेवक राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, जेष्ठ नागरिक सेल अध्यक्ष शांताराम कुडे, व्याख्याते विवेक गुरव, शहराध्यक्ष प्रविण ढोरे, अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष मजहर सय्यद, सुरेश जांभुळकर, अतुल राऊत, मंगेश खैरे, शरद ढोरे, सचिन कडू आणि वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रभावी संभाषण किंवा भाषण करण्यासाठी, आपण प्रथम आपला हेतू आणि बोलण्याचा हेतू जाणून घेणे आवश्यक आहे.उत्कृष्ट संभाषण कला हि आपल्यातील विचार आदान-प्रदान करण्यासाठी उत्तम माध्यम आहे. तुम्ही तुमच्या सभोवतालच्या व्यक्तींशी कसे संवाद साधता तसेच यामधील समस्या, संघर्ष किंवा विरोधाभास कसे ओळखता येतील यासाठी संभाषण समस्या शिबिरे तुमच्या वक्तृत्व सुधारणा योजनेचा केंद्रबिंदू बनतील अशी अपेक्षा नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी व्यक्त केली.

या दहा दिवसीय संभाषण शिबीरात शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सेल, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना व्याख्याते विवेक गुरव हे प्रशिक्षण देणार आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page