Friday, September 20, 2024
Homeपुणेतळेगाववन्य जीव रक्षक मावळ व आपदा मित्र यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली…

वन्य जीव रक्षक मावळ व आपदा मित्र यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली…

तळेगाव (प्रतिनिधी):वन्यजीव रक्षक मावळ व आपदा मित्र गणेश निसाळ आणि शिवप्रसाद सुतार यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
कडोलकर कॉलनी येथील “बेटी बचाव बेटी पढाव”या शिल्पा समोर असलेल्या लाईट च्या खांबा वरिल सर्व्हीस वायर शॉर्टसर्किट होऊन जमिनीवर जळत होती.याचे गांभीर्य लक्षात घेऊन गणेश निसाळ व शिवप्रसाद सुतार यांनी ताबडतोब MSEB चे वायरमन सागर शेळके यांना घटनेची माहिती दिली. वायरमन शेळके देखील खबर मिळताच घटनास्थळी पोहचले व तेथील विद्युत प्रवाह बंद केला.
त्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापासून वाचली. कारण या ठिकाणी अनेक विद्यार्थी व नागरिक मोठया प्रमाणात ये – जा करत असतात, जर का याकडे लक्ष दिले नसते तर मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता होती. त्यावेळेस वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे रेस्कु टिम अध्यक्ष गणेश निसाळ व महावितरण चे सागर शेळके आणि सहकारी यांनी दाखविलेल्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page