Thursday, July 3, 2025
Homeपुणेमावळवन्यजीव सप्ताह निमित्त मावळातील पंधरा गावांमध्ये वन्यप्राण्यांबद्दल जनजागृती…

वन्यजीव सप्ताह निमित्त मावळातील पंधरा गावांमध्ये वन्यप्राण्यांबद्दल जनजागृती…

मावळ (प्रतिनिधी):वन्यजीव रक्षक मावळ संस्था व वनविभाग पुणे यांच्या माध्यमातून दर वर्षी प्रमाणे वन्यजीव सप्ताह देशभर 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जातो.
याही वर्षी वन्यजीव रक्षक मावळ संस्था व पुणे वनविभाग ,यांच्या संयुक्तविद्यमाने मावळ तालुक्यात गावो गावी फिरून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.यावेळी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे,सदस्य जिगर सोलंकी यांनी मुलांना मावळ तालुक्यातील आढळणारे वन्यप्राणी आणि त्यांचे महत्व, तसचे मानवी जीवनावर त्या वन्यप्राण्यांचे प्रभाव कसे आहे ते विद्यार्थ्यांना समजाऊन दिले. या 5 दिवसांमध्ये वनविभाग शिरोता,वनविभाग वडगांव व वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांनी 15 गावांमध्ये जाऊन जनजागृति केली त्यात कुने नामा, देवघर ,उक्सान, गोवीत्री,साई ,नानोली,नवलाख उंब्रे ,निगडे ,मळवली, कडधे, शिवणे, आढले ख., वडगांव मावळ, भोयरे, इंगळूण इत्यादी गावांमध्ये जाऊन जागृती केली.
वन्यजीव सप्ताह दरम्यान काही जखमी प्राणी जसे सांबर व 11 बगळे उपचारासाठी पाठवण्यात आले व काही प्राणी जसे की साप,कासव, पक्षी त्यांच्या अधिवासात सोडण्यात आले.शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मांतावर,वनपाल एस.एस. बुचडे, पी.एम.रासकर, घुगे, तसेच वडगांव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव,वनपाल ऐ. के. हिरेमट, स.चुटके, ड. दोमे आणि सर्व वनरक्षक व वनमजूर उपस्थित होते. तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्था चे संस्थापक निलेश गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे, सदस्य संतोष दहिभाते, संकेत भानुसघरे,शत्रुघ्न रासकर,विकी दौंडकर,साहिल नायर उपस्थित होते.
यावेळी कोणता ही वन्यप्राणी जखमी अवस्थेत अढळ्यास जवळ पासच्या प्राणीमित्राला किंवा वनविभागाला संपर्क(1926) या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करावा असे आव्हान वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी लोकांना केले.
दर वर्षी ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात जागतिक वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. सर्वांमध्ये वन्यजीवांविषयी जनजागृती व्हावी हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. आणि शालेय जीवनातच वन्यजीवांचे महत्व कळाले तर त्याचा अतिशय सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे आपण या वर्षी जनजागृती करण्याकरिता मावळातील शाळा आणि विद्यार्थ्यांना लक्ष केले आणि विशेष म्हणजे विद्यार्थी वर्गाकडून आम्हाला अप्रतिम प्रतिसाद मिळाला. याकामी आम्हाला मावळ वन्यजीव रक्षक संस्थेचा मोठा हातभार लाभला त्याकरिता त्यांचे देखील विशेष आभार मानत असल्याचे मत शिरोता वनपरीक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार यांनी यावेळी व्यक्त केले.
मावळ तालुक्यात सापांचे प्रमाण खूप जास्त आहे, तालुक्यात 36 जातीचे साप आढळुण येतात, त्यातील 4 विषारी साप प्रामुख्याने मानव वस्तीमध्ये आढळुण येतात, नाग, मण्यार, घोणस, फुरसे .वन्यजीव सप्तहानिमित्त डोंगराच्या कडेला असणारे गावामध्ये जाऊन विध्यार्थ्यां मध्ये जागृति करून त्यांनी काळजी घेण्याचे आव्हान केले. नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात साफसफाई ठेवावी व रात्रीचे बाहेर जातांना पायात बुट आणि हातामध्ये टॉर्च असले पाहिजे. चुकून साप चावल्यानंतर घाबरून न जाता जवळ पासच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे असे मार्गदर्शन यावेळी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अभ्यासक जिगर सोलंकी यांनी केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page