Friday, November 22, 2024
Homeपुणेमावळवाकसई तुकाराम नगर येथील घरगुती देखावे गणेशोत्सवाचे आकर्षण…

वाकसई तुकाराम नगर येथील घरगुती देखावे गणेशोत्सवाचे आकर्षण…

लोणावळा (प्रतिनिधी):संत तुकाराम नगर वाकसई चाळ येथील महादेव भवर, विषवकर्मा परिवार आणि प्रमोद धनवटे यांनी घरगुती गणपतीची सजावट करताना माती, पुठ्ठा, कृत्रिम रोपे व फळांच्या साहाय्याने बनविलेले विविध पारंपारिक देखावे परिसरातील आकर्षण बनले आहेत.
संततुकाराम नगर येथील महादेव भवर यांनी पुठ्ठ्या पासून शिव शंकराची आकर्षक पिंड तयार केली असून त्याच्या बाजूने कृत्रिम फळे व फुलांच्या माळा, आकर्षक बैल जोडी आणि त्यातच रंगीबेरंगी लकलकणारे विद्युत दिवे या सजावटीचे आकर्षण ठरत आहे.
विक्की विश्वकर्मा यांनी देखील पुठ्ठ्याच्या साहाय्याने श्री राम सेतू ची प्रतिकृती तयार केली असून त्यामध्ये रावणाची लंका,प्रभू श्रीराम,लक्ष्मण, हनुमान व वानरसेना श्री राम सेतू कसा तयार करतात हा आकर्षक देखावा स्थानिकांचे लक्ष वेधून घेणारा आहे.
वाकसई येथील प्रमोद धनवटे यांनी सुंदर अशी केदारनाथ दर्शन ची हिमालयाच्या पर्वत रांगेमधील श्री क्षेत्र केदारनाथ चे आकर्षक मंदीर खरोखरच आकर्षक होते. यापद्धतीने वाकसई येथील अनेक घरगुती गणेश सजावटी मध्ये अगदी साधे व आकर्षक आणि पर्यावरण पुरक देखावे सादर करण्यात आले.
- Advertisment -

You cannot copy content of this page