Thursday, July 3, 2025
Homeपुणेमावळवाकसई येथील शासकीय आरोग्य उपकेंद्र कधी होणार सुरु...

वाकसई येथील शासकीय आरोग्य उपकेंद्र कधी होणार सुरु…

वाकसई : पुणे जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्ला आरोग्य केंद्राचे वाकसई उपकेंद्र काही महिन्यांपासून बंद असून ते लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

पुणे जिल्हा परिषद सदस्या कुसुमताई काशीकर यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या नेतृत्वाखाली 3.38 लक्ष खर्च करून शासनाने 12/6/2019 ते 11/12/2019 या कालावधीत सदर आरोग्य उपकेंद्राची निर्मिती केली आहे.
सध्या हे उपकेंद्र धूळ खात पडले असून नागरिक उपचारासाठी हेलपाटे मारत आहेत.

वाकसई, देवघर, करंडोली, जेवरेवाडी व परिसरातील लोक वस्ती जास्त असल्याने कार्ला आरोग्य केंद्र नागरिकांना उपचारासाठी लांब होत असून वाकसई उपकेंद्रात उपचार घेणे अनेक नागरिकांना सोईस्कर ठरत असून लॉक डाऊन च्या मध्यवर्ती काळापासून हे आरोग्य उपकेंद्र बंद आहे. या ठिकाणी उपचारासाठी ग्रामीण परिसरातील अनेक प्रौढ, तरुण, बालके आणि महिला येतात व केंद्राच्या दरवाजाला लागलेले कुलूप पाहून विना आरोग्य सेवेचे परत जात आहेत. त्याचबरोबर परिसरातील गरोदर महिलांना तपासणी साठी वारंवार कार्ला येथे जाने अवघड होत असल्यामुळे वाकसई आरोग्य उपकेंद्र कधी सुरु होणार व सुरु झाल्यास याठिकाणी कायमस्वरूपी डॉक्टरची नियुक्ती होणार का? असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page