![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
कर्जत विधानसभेचा ” आमदार ” होण्याचा ” राजयोग ” कुणाचा..
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत यावेळी राज्यात शिवसेना – भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी महायुती झाल्यास हा मतदार संघ विद्यमान आमदार असलेल्या ” शिवसेनेच्या ” वाट्याला आल्यास या मतदार संघात ईच्छुक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजप उमेदवारांची चांगलीच गोची होणार आहे . त्यामुळे निवडणूक पूर्व आखलेली रणनिती उद्ध्वस्त होणार असून ” आता पुढे काय करायचे ” ? असा यक्षप्रश्न उभा राहणार आहे . किती जरी ठरवले तरी पक्षाचे वरिष्ठ नेते राज्याच्या राजकारणाला अनुसरून ” युती ” ठरवणार असल्याने अनेकांची स्वप्ने धुळीस मिळणार आहेत , यामुळे या मतदार संघात पुढे काय होणार ? हे येणारा कालच ठरवणार आहे.
अस म्हणतात ” राजयोग ” असल्याशिवाय ” राजपाटाची ” लढाई कुणीच जिंकू शकत नाही . आजपर्यंत कर्जत खालापूर मतदार संघात विधानसभेच्या अनेक निवडणुकांमध्ये हे पहाण्यास मिळाले आहे . या मतदार संघात अनेक मात्तबर नेत्यांनी ते आजमावले आहे . जय पराजयाचा अनेकांना अनुभव आला आहे , मग कधी या काटेरी मार्गावर असलेल्या ” खुर्चीपर्यंत ” पोहचण्यासाठी पर्यायी साम -दाम -दंड -भेद असे चौफेर डाव टाकत या मतदार संघातील अनेकांना धोबी पछाड़ झालेले पहाण्यात आलेले आहे . आजपर्यंत सुमंतराव राऊत , देवेंद्र साटम , वसंतशेठ भोईर , संतोषशेठ भोईर , हनुमंतशेठ पिंगळे , भरत भाई भगत , उत्तम भाई जाधव , तर दस्तुरखुद्द माजी आमदार सुरेश भाऊ लाड , व विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना देखील कोणे एके काळी पराजयाला सामोरे जावे लागले होते.
त्यामुळे ” इच्छा शक्ती ” जरी असली तरी राजकारणात ” राजयोग ” असणे खूप महत्त्वाचे असल्याने , नेमकी हिच परिस्थिती कर्जत खालापूर मतदार संघात येवून ठेपली आहे . सद्य स्थितीत महायुतीतील व विरोधी असलेले मात्तब्बर पक्ष स्वतंत्र उभे राहून निवडणुकीस सामोरे गेले , तरच येथील इच्छुक उमेदवारांचे निवडणुकीस उमेदवार म्हणून उभे रहाण्याचे ” मनसुभे ” पूर्ण होतील , मात्र युती व आघाडी झाल्यास वरिष्ठ नेत्यांनी इच्छुक उमेदवारांना आता कितीही स्वप्न पूर्ण होण्याची आशा दाखवली , तरी ते शक्य होणार नाही . शिवसेना – भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी राज्यात महायुती झाल्यास युती धर्म नियमानुसार सध्याचे विद्यमान असणाऱ्या पक्षाच्या आमदारास येथील जागा मिळून ती उमेदवारी विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनाच मिळून येणार , हेच त्रिवार सत्य असेल . यामुळे पक्ष बदली , अपक्ष उमेदवार अशा घटना घडून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजपच्या इच्छुक उमेदवारास धोक्याची घंटा असून सर्व स्वप्न धुळीस मिळणारे असतील , हि काल्या दगडावरची रेघ असेल . त्यामुळे पुढे काय होणार ? हे आता तरी तूर्तास गुलदस्त्यात बंद आहे.