पिंपरी चिंचवड : वडगाव मावळ येथे दि.7 रोजी विश्वजीत देशमुख (वय २२ ) याच्या खुनातील आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हे शाखा युनिट 1 नी यश संपादन केले.
आरोपी राम विजय जाधव ( वय 22 वर्षे , रा.पंचतारा नगर , आकुर्डी , पुणे २ ), आदित्य ऊर्फ सोन्या सुरेंदर चौव्हाण ( वय २२ वर्षे , रा.श्री बालाजी गल्ली नं . २ , धनगर बाबा मंदिरामागे , काळेवाडी , पुणे ) यांना युनिट 1 च्या पथकाने मोठया शिताफिने ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात वडगाव मावळ पोलीस स्टेशनकडे सदर घटेनबाबत गु.रजि.नं .117 / 2022 भा.द.वि कलम 302 , 307 , 143 , 147 , 148 , 149 सह भारतीय शस्त्र अधिनियम 1962 चे कलम 4 ( 25 ) असा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
युनिट 1 चे पोलीस पथक हददीत फ़रारी आरोपींचा शोध घेत असताना पो.हवा . महादेव जावळे व बाळु कोकाटे यांना बातमीदाराकडुन माहिती मिळाली की , काळेवाडी परीसरात राहणारे अदित्य उर्फ़ सोन्या चौव्हाण व राम विजय जाधव हे काळेवाडी चौकात असताना त्यांनी तळेगाव किंवा वडगाव मावळ परीसरात कोठेतरी कोणाचा तरी गेम केला असल्याबाबत चर्चा करत होते . अशी माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी युनिट 1 कडील दोन पथके तयार करून त्यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करून पथकासह स्वतः काळेवाडी , रहाटणी , आकुर्डी या परिसरात जावुन बातमीतील नमुद इसमांचा शोध घेत असताना आकुर्डी येथील जयगणेश व्हीजन , आयनॉक्स थिअटरच्या पार्किगमध्ये आरोपी राम जाधव व अदित्य उर्फ़ सोन्या चौव्हाण हे दोघे त्याच्या मित्रासोबत दिसले . त्यावेळी त्यांना पडण्यासाठी पोलीस पथक त्यांच्याकडे जात असताना ते पळुन जावु लागले त्यांचा पोलीस पथकाने पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्यांना पकडले.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी राम विजय जाधव व आरोपी आदित्य उर्फ सोन्या सुरेंदर चौव्हाण आणि त्यांचे इतर 6 मित्र दि.7/6/2022 रोजी वडगाव मावळ येथे वाढदिवसाच्या पार्टीसाठी जात असताना मातोश्री हॉस्पीटल जवळ , रोडचे कडेला असणाऱ्या पान टपरीवर थांबलेल्या इसमांशी किरकोळ कारणावरुन त्यांची भांडणे झालेली होती त्यात टपरी चालक व त्याच्या मित्रांनी आरोपींना मारहाण केली होती . त्याचाच राग मनात धरून आरोपी व त्याचे 6 साथीदार यांनी दि .13 / 06 / 2022 रोजी भांडणाच्या तयारीत पुन्हा वडगाव येथील पानाच्या दुकानाजवळ जावुन त्यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तींना तलवार व कोयता घेऊन मारहाण करण्याच्या उद्देशाने गेले होते. यात विश्वजित आणि त्याचा मित्र सागर यांच्यावर वार केले असता गंभीर दुखापत झाल्याने विश्वजित याचा मृत्यू झाला तर भांडणे सोडविण्यासाठी गेलेला मित्र सागर इंद्रा हा गंभीर जखमी झाला.याबाबत वडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.अशा प्रकारे अज्ञात इसमां विरुद्ध दाखल झालेला खुनाचा गुन्हा केवळ ऐकिव माहिती गांभिर्याने घेऊन उघडकीस आनण्यात गुन्हे शाखा युनिट 1 ला यश आले आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे , अप्पर पोलीस आयुक्त डॉ . संजय शिंदे , पोलीस उप आयुक्त डॉ.काकासाहेब डोळे , सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा , युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस अंमलदार महादेव जावळे , बाळु कोकाटे , सोमनाथ बोऱ्हाडे , अमित खानविलकर , मनोजकुमार कमले , गणेश महाडीक , उमाकांत सरवदे , सचिन मोरे , प्रमोद हिरळकार , विशाल भोईर , मारूती जायभाय , प्रमोद गर्जे , स्वप्निल महाले यांच्या पथकाने केली आहे .