Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन भूमिपूजना निमित्त कर्जतमध्ये निळे वादळ "…

” विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन भूमिपूजना निमित्त कर्जतमध्ये निळे वादळ “…

” तुमचे स्वप्न व माझे वचनपूर्तीची ” हि विजयी सभा – कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) गेली १५ वर्षे मी तुमचा ” संघर्ष ” डोळ्याने बघत होतो , मात्र ” विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन ” हे माझ्या हस्तेच ” भूमिपूजन ” होवून साकारणार हे विधिलिखित आज सत्य झाले , हे मी माझे भाग्य समजतो , आजचा दिवस खरोखर ” सुवर्ण अक्षरात ” लिहिण्या सारखाच आहे , असे ” आनंदी उद्गार ” कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी काढल्याने टाळ्यांच्या एकच कडकडाट झाला . विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन या ऐतिहासिक वास्तू चे आज रविवार दिनांक ६ ऑक्टोंबर २०२४ रोजी फायर ब्रिगेड मुद्रे – कर्जत येथे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या शुभहस्ते व बौद्ध भंते यांच्या प्रमुख उपस्थितीत तर हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या आंबेडकरी अनुयायी यांच्या निळ्या वादळाच्या साक्षीने हा ” न भूतो – न भविष्यती ” डोळ्याचे पारणे फिटनारा सोहळा संपन्न झाला . या निमित्ताने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भव्य दिव्य ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून भवनाच्या ठिकाणी आले . यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना उचलून त्यांच्या विजयी घोषणा देत भीम सैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे उपस्थित आंबेडकरी अनुयायी जन सागरास मनापासून जयभीम करत म्हणाले की , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २४ ऑक्टोंबर रोजी धम्म परिषदेची स्थापना केली , ३ ऑक्टोंबर रोजी आर पी आय पक्षाची मुहूर्तमेढ रोवली , म्हणूनच आज आपल्या इथे ६ ऑक्टोंबर २०२४ रोजी भूमिपूजन केले , यावर त्यांनी प्रकाश टाकला . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ” संविधानाच्या ” माध्यमातून या देशात लोकशाही उभी केली , मी डॉ बाबासाहेबांचे विचार वाचल्यावर असा महामानव होणे नाही , असे मला वाटले म्हणूनच त्यांच्यासाठी हे भवन उभे करण्याची ईच्छा मी कृतीत उतरवली व प्रथम प्राधान्य दिले . त्यांचे विचार ” चिरकाल ” टिकण्यासाठी या भवनाची गरज आहे . जगभरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होते , तर जगात सर्वांत जास्त स्मारक त्यांचेच आहेत , असे गौरोद्गार काढले.
कोलंबिया विद्यापीठास २५० वर्षे पूर्ण होत असताना तिथे अमेरिका राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे केले , व ” इथे शिक्षण घेणारा बुद्धिवान व्यक्ती ” असा उल्लेख कोरले . जगाच्या १० हजार वर्षापूर्वी बुद्धिमान व्यक्ती सर्व्हेक्षण झाले त्यात ४ थे क्रमांकाचे नाव बाबासाहेब होते , तर प्रथम क्रमांक ” तथागत बुद्ध ” यांचे होते , असा इतिहास त्यांनी कथन केला . त्यांनी शिका – संघटित व्हा – संघर्ष करा , असे मोलाचे विचार सर्वांना दिले , संघर्ष करायचा असेल तर पहिले शिकावं लागेल , असे बाबासाहेब म्हणाले , पिढ्यान् पिढ्या संविधानाच्या रूपाने त्यांचे विचार चालत राहितील ते कुणीच बदलू शकत नाहीत , म्हणूनच या महामानवाच्या भवन होण्यासाठी मी पुढाकार घेवून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंत्ती करून ५ करोड रुपयांचा निधी मंजूर करून घेतला . सर्वांच्या सहकार्यातून हे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन उभे रहाणार आहे , अशा ऐतिहासिक वास्तू या शहरात निमिर्ती करून कर्जत शहराचे नंदनवन केले , असे बहुमोल विचार मांडत , पुढील काळात अजून विकास करण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे , असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

तमाम आंबेडकरी अनुयायी यांनी बघितलेले स्वप्न तुम्ही साकार करून , दिलेले वचन पाळून वचनपूर्ती केलीत , म्हणूनच आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला साथ देवू , आम्ही तुमच्या पाठीशी असू , असे आश्वासन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष तथा कर्जत नगर परिषदेचे जेष्ठ मा. नगरसेवक व उपनगराध्यक्ष राहुल डाळींबकर यांनी समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीने दिले . तुमच्या शब्दात ताकद आहे , तुमच्या कार्यात ताकद आहे , असे गौरोद्गार त्यांनी कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या बद्दल मत व्यक्त केले . १५ वर्षे लढा देणाऱ्या सर्व जेष्ठ भवन संघर्ष समिती सदस्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी उपस्थित सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा भव्य पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला . याप्रसंगी दिपक भालेराव , भीम आर्मीचे ऍड. सुमित साबळे , बी एस पी जिल्हाध्यक्ष सचिन भालेराव , विधानसभा अध्यक्ष योगेश भाई गायकवाड , यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले . यावेळी रॉयल गार्डन हॉलमध्ये ” निळे वादळ ” उमटल्याचे चित्र दिसले . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता . यावेळी ” भवनाच स्वप्न झालंय पूर् ” , आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या कार्यावर लिहिलेले हे गाणं कवी – मुकुंद सोनावणे यांनी संगीतबध्द केलेले गायिका मृणाली मनोज गायकवाड यांनी गायले , तर गायक अजय गायकवाड , गायक सुमेध जाधव यांनी गीत गायनातून उपस्थितांची मने जिंकली . यावेळी विचार पिठावर कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे , शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर , उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , आर पी आय ( आठवले ) नेते राहुल डाळींबकर , स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा प्रथम उपनगराध्यक्ष उत्तम भाई जाधव , कोकण उपाध्यक्ष मारुती दादा गायकवाड , जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड , जिल्हाध्यक्ष सचिन भालेराव , आर पी आय कर्जत ता. अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड , महिला अध्यक्षा अलका सोनावणे , मा. नगराध्यक्षा रजनी गायकवाड , राजिप मा. समाज कल्याण सभापती सुभाष गवळे , शिवसेना ता. प्रमुख संभाजी जगताप , सिध्दार्थ सदावर्ते , मा. उपसभापती मनोहर दादा थोरवे , संघटक शिवराम बदे , शेखर जांभळे , भाजप जिल्हा सचिव रमेश दादा मुंडे , भाजप ता. अध्यक्ष राजेश भगत , दिपक भालेराव , भीम आर्मीचे ऍड. सुमित साबळे , एसआरपी कर्जत ता. अध्यक्ष प्रभाकर दादा गोतारणे , शहर अध्यक्ष अरविंद मोरे , बीएसपी विधानसभा अध्यक्ष योगेश भाई गायकवाड , संपर्क प्रमुख दिलीप ताम्हाणे , ऍड . उत्तम गायकवाड , मा. नगरसेवक ऍड. संकेत भासे , संघटक नदीम भाई खान , उप शहर प्रमुख मोहन भोईर , सनी चव्हाण , सुभाष गायकवाड , त्याचप्रमाणे धार्मिक , राजकीय , शैक्षणिक , सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच कर्जत तालुक्यातील आंबेडकरी अनुयायी , तमाम बहुजन वर्ग , व बौद्ध बांधव , जेष्ठ नागरिक , महिला वर्ग , तरुण – तरुणी , हजारोंच्या संख्येने उपस्थित होते . या भवन सोहळ्या निमित्ताने कर्जतमध्ये ” निळे वादळ ” उमटल्याचे चित्र दिसले.
- Advertisment -

You cannot copy content of this page