Friday, September 20, 2024
Homeपुणेलोणावळाविसापूर किल्ल्यावर पाय घसरून पडलेल्या पर्यटकाला वाचविण्यासाठी मध्यरात्री बचावकार्य…

विसापूर किल्ल्यावर पाय घसरून पडलेल्या पर्यटकाला वाचविण्यासाठी मध्यरात्री बचावकार्य…

लोणावळा (प्रतिनिधी):किल्ले विसापूर येथे फिरायला आलेल्या एक पर्यटक पाय घसरून पडल्याचा प्रकार सायंकाळी पाच वा. च्या सुमारास घडला. त्या जखमी पर्यटक मुलाला वाचविण्यासाठी शिवदुर्गं मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ व ग्रामस्थांनी चक्क रात्री बारा वाजता रेस्क्यू ऑपरेशन करून प्राण वाचविले.
पुण्याहून चार मित्र किल्ले विसापूर येथे दुपारी फिरण्यासाठी गेले होते. त्यातील एकजण वाट चुकला व पाय घसरून पडला. त्यास वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले नंतर रेस्क्यू पथकाने रात्री बारा वाजता त्याला रेस्क्यू करून गावात आणले.
अर्जुन पाटील, शैलेश गायकवाड, विक्रम जाधव, व उतारेश्वर सुरवस (सर्व मूळ रा. मिरज, सांगली ) हे चार मित्र पुण्याहून किल्ले विसापूर येथे फिरण्यासाठी आले होते.सायंकाळी पाच वाजता यातील अर्जुन पाटील हा इतर मित्रापासुन बाजूला चालत गेला व वाट चुकला. मी खाली गावाकडे चाललो आहे असा पहिला फोन बरोबरच्या मित्रांना केला.थोड्या वेळाने मी पडलो आहे माझ्या मदतीला या असा फोन केला.

बरोबरचे मित्र त्याला शोधत शोधत खाली गावापर्यंत आले. गावातील लोकांना घडलेली घटना सांगितली त्यावेळी गावातील काही तरुण अर्जुनला शोधण्यासाठी निघाले.त्याच वेळी शिवदुर्ग रेस्कू टिमला सात वाजता मेसेज आला होता. पण स्थानिक लोक त्याला शोधून खाली गावात घेऊन येतील म्हणून वाट बघत बसले.त्यानंतर रात्री 9:20 वाजता स्थानिक नागरिकांनी फोन केला की मदतीला या त्याचा एक हात फ्रॅक्चर झाला आहे. मुक्का मार लागला आहे. हनुवटीला मार लागला आहे, दात पडले आहेत. मग शिवदुर्ग टीम निघाली.अर्जुन उभा राहत होता पण चालताना पाय नीट पडत नव्हते.
वाट धबधबे , चिकट शेवाळलेले दगड, चिखल, दाट झाडी झुडपे. यामध्ये त्याला चालवणे योग्य वाटत नव्हते म्हणून स्पाइन बोर्ड लावून स्केडच्या स्ट्रेचर मधून गावात आणले. पाटण गावातील लोकांनी खुप सहकार्य केले. अथक प्रयत्न करून रात्री 12:00 वाजता खाली गावात पोचले. गावातील लोकांनी त्याची चहा पाण्याची स़ोय केली. त्याला बदलण्यासाठी कपडे दिले. त्यांचे मित्र तोपर्यंत पाटण पर्यंत पोहचले होते त्यांच्या गाडीत अर्जुनाला बसवून दिले व इतर मित्रांना लोणावळा रेल्वे स्टेशनला‌ सोडून देण्यात आले.
या रेस्क्यू मध्ये शिवदुर्ग मित्र लोणावळा,व वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे योगेश उंबरे प्रणय अंभूरे,कुणाल कडु, रतन सिंग,आदित्य पिलाने, सिध्देश निसाळ, अमोल सुतार, योगेश दळवी, मयुर दळवी, सागर कुंभार, अजय मयेकर, चंद्रकांत बोंबले, अनिल आंद्रे, सुनिल गायकवाड, संभाजी तिकोणे,रवींद्र तिकोणे, विनायक तिकोणे व पाटण ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.
- Advertisment -

You cannot copy content of this page