Wednesday, April 30, 2025
Homeपुणेलोणावळावेहेरगाव येथे अचानक आग लागून चार दुकाने खाक…

वेहेरगाव येथे अचानक आग लागून चार दुकाने खाक…

लोणावळा (प्रतिनिधी): वेहेरगाव येथील अचानक आग लागून चार दुकाने खाक झाली आहेत.रात्री दोन वाजण्याच्या सुमारास वेहेरगाव ग्रामपंचायतीच्या कमानीजवळ ही दुर्घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.
आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. दुकानांना आग लागल्याची माहिती समजताच ग्रामस्थांनी ती विझवीण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने रौद्ररूप धारण केले होते. आज सकाळी पोलीस प्रशासनाकडून या दुकानांचा पंचनामा करण्यात आला.तसेच मावळचे आमदार सुनिल आण्णा शेळके यांनी देखील याठिकाणी भेट देत दुर्घटनेची पाहणी केली.
- Advertisment -

You cannot copy content of this page