Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळाव्ही पी एस विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा संपन्न…

व्ही पी एस विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा संपन्न…

लोणावळा : विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
पालखी सोहळ्यानिमित्त पारंपारिक वेशभूषा स्पर्धा, अभंग गायन स्पर्धा, काव्य गायन स्पर्धेचे आयोजन प्रशालेच्या प्रकाश हॉलमध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाचे परीक्षण प्रशालेच्या पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे यांनी केले.
कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीम.क्षमा देशपांडे आणि मुख्य लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन कलाशिक्षक श्री.योगेश कोठावदे, श्री.चंद्रकांत जोशी, श्री.महेश चोणगे, श्री.धनंजय काळे, श्री.विक्रम शिंदे आणि पालखी सजावटीसाठी सेवक श्री. गजानन कदम यांचे सहकार्य मिळाले.
यावेळी वैयक्तिक गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ओम सोनुणे (सातवी अ), द्वितीय क्रमांक स्वराज निकम (सातवी अ), तृतीय क्रमांक रुद्र इंगुळकर (सहावी क) तसेच पारंपरिक वेशभूषा स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी मधून प्रथम क्रमांक मयुरेश पवार, द्वितीय क्रमांक शुभ्रा बदर, तृतीय क्रमांक विराज गिद्दी, सहावी मधून प्रथम क्रमांक हर्षद ठोंबरे, द्वितीय क्रमांक तनुजा वाघ, तृतीय क्रमांक युवराज विलाने आणि इयत्ता सातवी मधून प्रथम क्रमांक समर्जित पोटफोडे, द्वितीय क्रमांक रुद्र शिंदे, आणि तृतीय क्रमांक भक्ती हुंडारे या विद्यार्थ्यांनी मिळवले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक प्रशालेचे प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर यांनी शालेय साहित्य व प्रशस्तीपत्र देऊन केले. तसेच नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजय भुरके आणि नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
पालखी सोहळा प्रशालेच्या मैदानावरती पार पडला. पालखीचे पूजन प्राचार्य तसेच उपस्थित मान्यवरांनी केले. त्यानंतर पालखी प्रशालेच्या मैदानावरती प्रदक्षिणा घालून विद्यार्थ्यांना दर्शनासाठी पालखी मैदानाच्या मधोमध ठेवण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वर्गशिक्षक, शिक्षक तसेच सेवकांनी मोलाचे सहकार्य केले. पालखी सोहळा संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
- Advertisment -

You cannot copy content of this page