Saturday, October 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडशिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख " भाई गायकर " यांची जिल्हा नियोजन सदस्यपदी नियुक्ती !

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ” भाई गायकर ” यांची जिल्हा नियोजन सदस्यपदी नियुक्ती !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) गेली चाळीस वर्षे राजकारणात असलेले व शिवसेनेच्या मुशीत वाढून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचाराने प्रेरित होवून शिवसेनेचे रोपटे कर्जत तालुक्यात वट वृक्ष करण्यात नेहमीच अग्रेसर असणारे त्याचप्रमाणे कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे अत्यंत विश्वासू असलेले , गोर गरीबांचे कैवारी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांची नुकतीच रायगड जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याची घोषणा राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली . त्यांना त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याचा सन्मान करून हे जिल्ह्याचे प्रशासकीय पद मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून मान्यवरांकडून व राजकीय पदाधिकारी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कर्जत तालुक्यातील वेणगाव येथे रहाणारे भाई गायकर हे अजातशत्रू असलेले तालुक्यातील बडी आसामी म्हणून ओळखले जातात . गोरगरिबांना मदतीचा नेहमीच हात देणारे व कुणाच्याही नाजूक प्रसंगी धावून जाणारे भाई गायकर आपल्या कार्याच्या पुण्याईनेच येथवर पोहचले आहेत . १९८० च्या दशकात शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेवून कर्जत – खालापूर तालुक्यात ग्रामीण भागातील गाव – वाडी – शहर येथवर त्यांनी शिवसेना पोहचवून वट वृक्षात रूपांतर केले . वेणगाव चे ” शाखाप्रमुख ते उपजिल्हाप्रमुख ” हा त्यांचा शिवसेनेतील प्रवास खूपच साहसी आहे .त्यांनी वेणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच पद देखील भूषविले असून ग्रामपंचायतीवर नेहमीच आपल्या प्रभागातून निवडून गेले आहेत.
सामाजिक कार्याची जाण व राजकारणातून प्रशासकीय कामाचा दांडगा अभ्यास माहित असणारे भाई गायकर या ” अभ्यासू नेतृत्वाची ” निवड जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य म्हणून रायगड प्रशासकिय विभागाकडून करण्यात आल्याने कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

त्यांना दिलेल्या या पदामुळे त्यांच्या कार्यात अजून भर पडणार असून त्यांच्या जबाबदारीत वाढ झाली आहे , तर शिवसेना पक्ष वाढीसाठी योग्य असा फायदा होणार आहे . भाई गायकर यांचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page