लोणावळा दि.27: केंद्र सरकारने शेतकरी विरोधी असलेले तीन कायदे मागे घ्यावेत यासाठी शेतकऱ्यांना पाठिंबा देत लोणावळा शहर काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन संपन्न.
केंद्र सरकारने शेतकरी विरोधातील तीन कायदे मागे घ्यावेत तसेच तरुणांमध्ये वाढती बेरोजगारी आणि सतत वाढणारे पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर या मुद्याला अनुसरून केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून आज भारत बंद ठेवण्यात आला असून त्याला प्रतिसाद देत लोणावळा शहर काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग कुमार रिसॉर्ट चौक येथे करण्यात आले.
असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. रास्ता रोको मूळे किमान अर्धा तास महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
भाजपा व मोदी हे देशात. भारत हा शेती प्रदान देश असून देशाच्या अर्थ व्यवस्थेचा कणा असणारे शेतकरी हे केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी विरोधातील तीन कायदे रद्द करावेत म्हणून शेतकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन केले असताना केंद्र सरकार याची दखल घेत नाही.
सामान्य नागरिकांना पिळून काढणाऱ्या महागाईवर सरकारचे नियंत्रण राहिलेले नसून पेट्रोल, डिझेल, व गॅसचे दर वाढत आहेत. देशातील युवकांना रोजगार देण्याची घोषणा मोदी सरकारने केली होती प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नसून कोट्यावधी युवक बेरोजगार झाले आहेत.सरकारी आस्थापनांचे खाजगीकरण सुरु असून यांना देश सांभाळता येत नसेल तर यांनी स्वतःच राजीनामे द्यावेत अशी मागणी यावेळी निखिल कवीश्वर, प्रमोद गायकवाड व पदाधिकारी यांनी केली.
लोणावळा शहर काँग्रेस अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली,लोणावळा उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलीसांच्या चोख बंदोबस्तामध्ये आंदोलन शांततेत पार पडले.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल कवीश्वर, लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, युवक अध्यक्ष दत्ता दळवी, रवी सलोजा, महिला अध्यक्षा पुष्पा भोकसे, उप नगराध्यक्षा संध्या खंडेलवाल, माजी उप नागराध्यक्ष सुधीर शिर्के, गटनेत्या आरोही तळेगावकर, नगरसेविका पुजा गायकवाड, सुवर्णा अकोलकर, उषा चौधरी, वसंत भांगरे,नासीर शेख, जितेंद्र कल्याणजी, बाबुभाई शेख, जंगबहादूर बक्षी, सुबोध खंडेलवाल, संजय वाघ, मारुती तिकोणे, सुनील मोगरे, आकाश परदेशी, जाकीर शेख, सर्फराज शेख, सत्तार शेख, संभाजी गवळी, संजय शिंदे, अनिल गवळी, महादू गवळी, अमोल शेडगे, प्रफुल राजपूत, अय्याज शेख, शुभम हारपुडे, पप्पू औरंगे, फिरोज शेख, फिरोज बागवान, गणेश गवळी समवेत काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते असंख्य प्रमाणात आंदोलनात सहभागी झाले होते.