मुळशी ( प्रतिनिधी ) आंबवणे येथे स्व. विठोबा कालेकर प्रतिष्ठान व गुरुदत्त उत्सव समिती आयोजित श्री गुरूदत्त जन्मोत्सव विविध कार्यक्रमातून उत्साहात पार पडला.
सकाळी श्री दत्तात्रयाचे महापुजन व अभिषेक मा उपसरपंच देविदास मेंगडे सौ. रिमाताई मेंगडे व प्रसीद्ध उद्योजक कॅनरी आयरल्यांड चे मालक मिलिंद वाळंज श्री रोहिदास जाधव व सौ. मंगलताई जाधव, श्री.प्रवीण माताळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालयातील व जि प केंद्र शाळा आंबवणे येथील विद्यार्थ्यांच्या गोळफेक, थाळीफेक, भाला फेक, धावणे विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराचे उदघाटन आणि रामलल्लाच्या मूर्तिच्या प्राणप्रतिष्ठापानेच्या निमित्त मंगल जलकलशाचे दिंडी सोहळा तुन पालखी द्वारा आंबवणे गावातून पूजन व नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. गीताजयंती च्या औचित्याने पालखीतून श्री भगवतगितेचे पूजन करण्यात आले.
मावळातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प शेटे महाराज,पारकर गुरुजी व सहकारी पिरंगुट,त्रिमूर्ती भजन मंडळ, कोकणातील फाशापूर येथील भजन मंडळ यांची भजन सेवा झाली .हभप कृष्णा महाराज पडवळ यांचे जन्मोत्सवाचे सुश्राव्य कीर्तन झाले. श्री दत्तात्रय जन्मोत्सव वेळी आदर्श सरपंच सौ वत्सलाताई वाळंज , विद्यमान सरपंच सीताताई कराळे ,ग्रामपंचायत सदस्या अक्षरा दळवी मेघा नेवास्कर ,तसेच शांताबाई कालेकर, शिक्षिका शालिनी देवरे व शाळेतील विद्यार्थिनीं यांनी सहभाग घेतला.
या प्रसंगी बप्पीदा गोल्डमॅन मराठी बिगबॉस फेम संतोष चौधरी उर्फ दादूस यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.नवनिर्वाचित सरपंच सीताताई कराळे,उपसरपंच सुनीलभाऊ हुंडारे व सर्व सदस्य यांचा व उपस्थितीत मान्यवरांचा यथोचित सन्मान उत्सव मंडळाचे श्री चंद्रकांत मामा कालेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
क्रीडास्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.बाळासाहेब खेडकर व संजय कुलथे यांनी सूत्रसंचालन केले. रविंद्र सोनवणे, राहुल आवळे, विजय दळवी, शालिनी देवरे, संतोष दळवी, महादेव खेडकर व सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.महाप्रसदानंतर कार्यक्रमाची सांगता केली.