Friday, October 18, 2024
Homeपुणेलोणावळाश्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी पायी दिंडीचे खंडाळा शिवसेना परिवाराकडून स्वागत..

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी पायी दिंडीचे खंडाळा शिवसेना परिवाराकडून स्वागत..

लोणावळा (प्रतिनिधी) : श्री संत श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आळंदी येथे ठाणे पालघर भिवंडी रायगड नवी मुंबई मुंबई येथून पायी वारकरी बंधू भगिनी मातांचे सालाबादप्रमाणे यंदाही खंडाळा येथे स्वागत करून फलहार वाटप, नाष्टा, जेवण तसेच सर्वांचे आरोग्य तपासणी व औषध वाटप खंडाळा येथील हनुमान मंदिर येथे शिवसेना परिवार खंडाळा व सह्याद्री मानव सेवा मंच ठाणे यांच्या वतीने करण्यात आले.
याप्रसंगी सह्याद्री मानव सेवा मंचच्या वतीने डॉक्टर ए.डी. जोशी, डॉक्टर अनिल रत्नाकर, डॉक्टर शेठ ,डॉक्टर कोटक ,डॉक्टर गोविंद ,सिस्टर करमरकर,निमकर,मुळे,माटे तसेच रंगनाथ वरे,सतीश वैद्य, मंगेश जोशी, दत्तात्रेय भोईर, खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर गमे मॅडम, सिस्टर श्रीमती विजया चौधरी, सिस्टर कौरव नितीन काळे या सर्व स्वागत कक्षाचे प्रामुख्याने नियोजन मच्छिंद्र खराडे शिवसेना माजी जिल्हाप्रमुख, सचिन वाळके,भावेश खराडे, विशाल पात्रे, पंकज पवार, बाबू पवार यांच्यासह अनेक शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page