मनोहरदादा थोरवे – माजी उपसभापती.
सौ . पूजा सुर्वे.
शिवराम बदे.
पत्रकार – विजय मांडे.
सौ .रेखा ठाकरे
भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे)विधानसभेच्या निवडणुका होऊन तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर शासनाने गरीब – गरजू – दुर्बल – विधवा – अपंग – विना अपत्य – मुलगा नसलेले वयोवृद्ध यांना मिळणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती यादीची नुकतीच निवड करण्यात आली . या महत्वपूर्ण समितीची निवड करण्यास ३ वर्षांचा कालावधी लागल्याने साहजिकच या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींना आता पर्यंत वाऱ्यावर सोडल्याचे चित्र असताना अनेक संघटनांनी लवकरात लवकर हि समिती गठीत करावी , अशी मागणी लावून धरली होती.
कोरोना काळात अनेक लाभार्थींची प्रकरणे धूळ खात पडली असताना त्यावेळी लाभार्थींना संताप अनावर होत होता .मात्र ” देर है , दुरुस्त है ” या उक्तीप्रमाणे आता या समितीच्या अध्यक्षपदी कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मा .मनोहर दादा थोरवे यांची नियुक्ती शासनाच्या वतीने व पालकमंत्री यांनी केलेल्या शिफारशीनुसार रायगड जिल्हाधिकारी यांनी केली आहे.
कोरोना संसर्ग महाकाळाची २ वर्षे झाल्यावर आता परिस्थिती पूर्व पदावर आल्यावर या समितीची घोषणा झाली आहे . यांत मनोहर सदाशिव थोरवे – अध्यक्ष , सौ . कांता पादिर , सौ . रेखा रामदास ठाकरे , शिवराम बदे , ऋषिकेश भगत , सौ . पूजा प्रताप सुर्वे , अमर साळोखे , अरविंद कटारिया , भाई गायकर , पत्रकार विजय मांडे , पंचायत समितीचे गटविकास अधिकारी , असे सर्व सदस्य व कर्जत तहसीलदार सदस्य – सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.तीन वर्षांनंतर संजय गांधी निराधार अनुदान योजनेला अखेर मुहूर्त मिळाला असल्याने यांत मोडणाऱ्या लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सुटून त्यांची कामे आता लवकरात लवकर होतील , असा विश्वास आता वाटत आहे .