कार्ला मावळ दि . 24 ऑक्टोंबर 2020 : कोरोनाचा प्रादुर्भाव शंभर टक्के कमी व्हावा या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर यांच्या वतीने कार्ला गावातील नागरीकांना रक्त वाढीच्या व व्हिटामिन डी,या दहा हजार गोळ्या वाटप करण्यात आल्या आहेत.
सध्या राज्यात अनलाॅकची प्रक्रिया सुरु आसली तरी नागरींकांनी शोशल डीस्टंन्स, मास्क चा वापर करणे गरजेचे आहे.कार्ला परीसरात अनेक पर्यटनस्थळे असुन पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत .परंतु नागरींकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
या वेळी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कैलास शंकरराव हुलावळे यांच्या प्रयत्नातून या गोळ्या वाटप करण्यात आल्या असुन कार्ला येथील मारूती मंदिरासमोर या गोळ्यांचे वाटप नागरीकांना करण्यात आले. यावेळी कार्ला ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अविनाश हुलावळे, माजी उपसरपंच कैलास हुलावळे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भाऊसाहेब हुलावळे, हभप सिताराम हुलावळे, सचिन हुलावळे,दिनेश जाधव,बाबाजी हुलावळे,आरोग्य सेवक चंद्रकांत गवलवाड,आरोग्य सेविका सुर्वणा बंडगर मॅडम,सखाराम चौरे, गेणु हुलावळे,राजु सावळे,दिनेश हुलावळे,साईराज हुलावळे, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष हुलावळे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्येक्रमाचे नियोजन माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब हुलावळे यांनी केले होते.