एसजी इंटरप्रायजेस संस्थापक अक्षय घोडके यांचे समाजाला आवाहन…
भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
समाजाने किंवा परिवाराने आपल्या कुटुंबातील सदस्यांना वंचित करून दूर ठेवलेल्या घटकांना त्याचप्रमाणे अनाथ – अंध – अपंग – व वृद्ध अश्या माणूस म्हणून जगणाऱ्या निसर्गाच्या अनमोल रत्नांबरोबर आपले सण , उत्सव साजरे करा , त्यांच्याशी आपलेपणा दाखवून त्यांच्यात मिसळा,यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद यासारखे सुख दुसरे कुठलेच नाही,असे भावनिक मत अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळाचे व्यवस्थापक तसेच एसजी इंटरप्रायजेसचे संस्थापक अक्षय घोडके यांनी व्यक्त केले.
आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कृष्णराव वृद्धाश्रम बदलापूर येथे १५ ऑगस्ट हा भारत देशाचा स्वातंत्र्य दिनाचा उत्सव येथील सर्व वृद्धांसोबत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम देखील पार पडला.त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कृष्णराव आश्रम अपार्टमेंट, मीनाताई ठाकरे उद्यान जवळ, गांधी चौक, बदलापूर (पूर्व) या वृद्धाश्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुनील कृष्णराव देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी बदलापूर मध्ये कार्यरत असलेली अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळाचे व्यवस्थापक तसेच एसजी इंटरप्राईजेसचे संस्थापक श्री . अक्षय घोडके यांनी भेट देऊन हा स्वातंत्र्य दिन कार्यक्रम आनंद महोत्सवाने साजरा करून सर्व समाजाला आव्हान केले की,आपणही आपले सण,त्सव , आपला अमूल्य वेळ परीवारा पासुन वंचित असलेल्या अनाथ, वृद्ध , अंध, अपंग व्यक्ती तसेच समाजाने किंवा परिवाराने बहिष्कृत केलेल्या व्यक्तीसोबत घालवावा व सामाजिक जीवनात शक्य तितके इतरांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करावा,असे अनमोल मार्गदर्शन केले.
यावेळी कृष्णराव वृद्धाश्रमाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. सुनील कृष्णराव देसाई , प्रमुख उपस्थिती म्हणून अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळ, बदलापूर व्यवस्थापक व एसजी इंटरप्रायजेसचे संस्थापक श्री. अक्षय घोडके ,श्रीमती सुधा दामले ,श्रीमती प्रज्ञा कांबळे , श्रीमती माधुरी कांबळे , कार्यवाहक श्रीमती कल्पना परब , श्री. जगन्नाथ कोंडविलकर ,श्रीमती संगीता शर्मा , कु. विनायक परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.