if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
मा.राजिप उपाध्यक्ष सुधाकर शेठ घारे यांचा पुढाकार..
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील कर्जत तालुक्यातील सांगवी येथे ” श्री सोमजाई मातेचा उत्सव ” मंगळवार दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी श्री सोमजाई माता मंदिर , मु. सांगवी, ता. कर्जत, जि. रायगड येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार असून त्यानिमित्ताने रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा आरोग्य – शिक्षण – क्रिडा सभापती श्री सुधाकर भाऊ घारे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली असून या उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमा सोबतच महिला भगिनींसाठी विविध कार्यक्रम व खेळांची पर्वणीच असल्याने तालुक्यातील तसेच वासरे परिसरातील महिला – भगिनी , भाविक – भक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहून खेळांचा , श्रवण सुखाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा , असे आग्रही निमंत्रण व आवाहन राजिप मा . उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांनी सर्वाँना केले आहे.
सांगवी तर्फे वासरे येथे श्री सोमजाई मातेच्या उत्सवानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजेस काकड आरती सकाळी ६.०० वा. ,
श्री सत्यनारायणाची महापूजा – दुपारी १२.०० वा. , हरिपाठ – दुपारी ३.३० ते ४.३० वा. , हळदीं – कुंकू व पैठणीचा खेळ – सायं. ४ – ३० ते ७ – ३० वा. , महाप्रसाद – रात्री ७ – ३० ते (आपल्या आगमनापर्यंत) , चक्रिभजन – रात्रौ ९ ते ११ वा. ( वासरे खोंडा परिसरातील भजनी मंडळे ) आदी कार्यक्रम आहेत.
या महा उत्सवासाठी प्रमुख उपस्थिती मा. श्री. अनिकेतभाऊ तटकरे आमदार – विधान परिषद कोकण विभाग , मा. सुनील अण्णा शेळके आमदार – मावळ विधानसभा मतदार संघ , मा. श्री. निलेशजी लंके आमदार – पारनेर विधानसभा मतदार संघ , या मान्यवरांची असून या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ” सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी , प्राजक्ता माळी , सायली देवधर – लग्नाची बेडी फेम सिंधू , ज्ञानदा रामतीर्थकर – टिपक्यांची रांगोळी फेम अप्पू ” यांची उपस्थिती असून प्रसिद्ध सेलिब्रिटी अँकर आर. जे. अक्षय यांचे सुमधुर आवाजाचे बोल ऐकण्यास मिळणार आहेत.
यानिमित्ताने होणाऱ्या ” हळदी कुंकू – २०२४ ” महिला भगिनीसाठी गप्पा गोष्टी, रंजक खेळ, मराठी हिंदी गाण्यासह कॉमेडीचा तड़का आणि आकर्षक बक्षिसे, पैठणी साडीचा खेळ रंगणार असून ” रंगला खेळ पैठणीचा – उत्सव सोमजाई मातेचा ” या हळदी कुंकू समारंभाच्या आयोजक सौ. भारती मधुकर घारे , सौ. नमिता सुधाकर घारे – सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत खांडपे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत . या खेळ पर्वणीत विजेत्यांना स्मार्ट टिव्ही , फ्रिज , वॉशिंग मशीन , कुलर फॅन , ओव्हन , अक्वागार्ड , मिक्सर , गॅस शेगडी , फॅन , इलेक्ट्रिक किटली , तर प्रथम १० विजेत्या महिलांना मानाची पैठणी , व उत्तेजनार्थ २५ महिलांना सोन्याची नथ व कुकर भेट मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे स्वागतात्सुक श्री. परशुराम कुशाबा घारे – मा. सरपंच ग्रुप ग्रामपंचायत खांडपे, श्री. मधुकर परशुराम घारे – मा. सरपंच ग्रुप ग्रामपंचायत खांडपे , व सर्व ग्रामस्थ मंडळ सांगवी , ता. कर्जत – रायगड असून कर्जत तालुक्यातील व वासरे परिसरातील सर्व राजकीय , सामाजिक , अध्यात्मिक , शैक्षणिक , कला क्षेत्रातील सर्व मान्यवर , भाविक व नागरिक , बंधू – भगिनींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी , असे आग्रहाचे निमंत्रण व आवाहन श्री. सुधाकर भाऊ परशुराम घारे – माजी उपाध्यक्ष तथा सभापती आरोग्य – शिक्षण – क्रिडा समिती यांनी केले आहे.