कार्ला (प्रतिनिधी) : नवरात्र उत्सवाच्या पाचव्या माळे निमित्त आज रविवारी भाविकांनी एकविरा गडावर अलोट गर्दी केली.कार्ला फाटा ते एकविरा गडापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून प्रचंड वाहतूक कोंडी परिसरात झाली.
नवरात्र उत्सवाच्या निमित्त एकविरा गडावर आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी पहिल्या माळेपासून भाविकांची गर्दी होत होती परंतु आज पाचव्या माळे निमित्त एकविरा देवी दर्शनासाठीची भाविकांची गर्दी लक्षनीय होती. यावेळी आज पहाटेपासून गडावर भाविकांची अफाट गर्दीतर होतीच परंतु कार्ला फाटा ते एकविरा गडापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
यावेळी पोलीस प्रशासनाकडून एकविरा गडावर होणारी गर्दी लक्षात घेत नवरात्र उत्सवात लोणावळा ग्रामीण पोलिस कर्मचारी,आरसीपी असा बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे.
तसेच एकविरा गडावरील दुकानदारांकडून पायऱ्यांवर चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी या भाविकांना त्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.