Friday, December 27, 2024
Homeपुणेलोणावळासामाजिक कार्यकर्ते अमित चोरडिया यांनी दिली व्हीपीएस विद्यालयाला उपयोगी वस्तूंची भेट....

सामाजिक कार्यकर्ते अमित चोरडिया यांनी दिली व्हीपीएस विद्यालयाला उपयोगी वस्तूंची भेट….

लोणावळा येथील प्रसिद्ध युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते अमित चोरडिया यांच्यातर्फे व्ही पी एस हायस्कूलला सॅनिटायझर स्टॅन्ड, सॅनिटायझर केन व थर्मल स्कॅनर ई. कोरोना काळातील अत्यंत उपयोगी वस्तू भेट केल्या. उद्योजक अमित चोरडिया हे ह्या शाळेचे 1994 सालचे एस एस सि बॅचचे माजी विद्यार्थी असून ज्या शाळेने उत्कृष्ट असे शिक्षण देऊन मोठे केले त्या शाळेच्या प्रेमा खातीर व हितार्थ, शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर शाळेतील शिक्षक, विध्यार्थी व पालक यांच्या आरोग्य सुरक्षेची जाणीव असल्याने ही उपयोगी भेट दिली आहे.

वेळेचे औचित्य साधून शाळेचे ऋण फेडण्याची संधी मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. विद्यालयाचे प्राचार्य विजय जोरी यांनी ही अपूर्व भेट स्वीकारताना अमित चोरडिया यांना शाळेच्यावतीने आभार मानले तर याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक उज्वला पिंगळे, रामदास दरेकर, दादाभाऊ कासार, मुख्य लिपिक भगवान आंबेकर, आदिनाथ दहीफळे व अन्य शिक्षक उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page