पवना नगर (प्रतिनिधी) : सावंतवाडी ग्रामविकास मंचच्या वर्धापनदिनानिमित्त महागाव येथे आयोजित आरोग्य शिबिरात 156 रुग्णांची तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात आले .
सावंतवाडी ग्रामविकास मंचच्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवार रोजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र महागाव येथे मायमर मेडिकल कॉलेज व डॉ . भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालय तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तपासणी व औषधोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले .सदर शिबिरात 156 रुग्णांची तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात आले . तसेच सावंतवाडी ग्रामविकास मंचच्या वतीने 52 गरजूंना मोफत चष्म्याचे वाटपही करण्यात आले.
काही रुग्णांना पुढील तपासणी व औषधोपचार करण्यासाठी हॉस्पिटलकडून विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून दिला जाईल , असे शिबीर समन्वयक डॉ . दर्पन महेशगौरी यांच्या वतीने सांगण्यात आले . तसेच ज्या रुग्णांचे आजार शासकीय योजनांच्या नियमात बसत नसेल , अशा रुग्णांना आमदार सुनील शेळके यांच्या वतीने सर्वोतोपरी मदत केली जाईल , असे आश्वासित केले.
गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी ग्रामविकास मंच व हॉस्पिटलमध्ये योग्य तो समन्वय साधून कार्य केले जाईल , असे सावंतवाडी ग्रामविकास मंचच्या वतीने सांगण्यात आले .यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धोंडिबा घारे यांनी केले . तर उपस्थितांचे आभार मंचाचे अध्यक्ष भगवान सावंत यांनी मानले.
या आरोग्य शिबिराला लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक निलेश माने , उपसरपंच स्वाती बहिरट , सदस्य संतोष घारे , उर्मिला पडवळ , योगिता सावंत , चेअरमन सखाराम कंधारे , पोलिस पाटील प्रल्हाद घारे , संचालक गोविंद सावंत , महिला अध्यक्षा आरती घारे , चंद्रभागा तिकोणे , रामदास घारे , दशरथ सावंत , लहू पडवळ , पांडुरंग पडवळ , दुदाजी पडवळ , लक्ष्मण मरगळे , अंकुश भालेसईन व सावंतवाडी ग्रामविकास मंचाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.