if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी) : एका विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची घटना आज दि.18/10/22 रोजी उघडकीस आली. या प्रकरणी घरातील पाच जणांविरोधात लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकाराबाबत आरती विशाल ओसवाल ( वय 30, व्यवसाय घरकाम, जात नवबौध्द, रा. एम. नं.139/2 तुंगार्ली लोणावळा, मूळ रा. लोधवडे, ता. माण, जि. सातारा ) यांनी लोणावळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून याप्रकरणी 1 ) पती विशाल ओसवाल , 2 ) सासु ताराबाई ओसवाल , 3 ) नणंद मनिषा ओसवाल , 4 ) दिर संदिप ओसवाल , 5 ) जावु रजवा ओसवाल सर्व रा . सोनार गल्ली मधील एफ -48 लोणावळा या पाच जणांविरोधात गु.रजि.नं.157/2022 भा.द.वि.का . कलम 498 ( अ ) , 354 , 323 , 504 , 506 , 34 अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतीबंद कायदा 1989 चे 3 ( 1 ) ( r ) ( s ) , 3 ( 2 ) ( va ) , 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे पती विशाल ओसवाल , सासु ताराबाई ओसवाल , नणंद मनिषा ओसवाल , दिर संदिप ओसवाल , जावु रजवा ओसवाल यांनी सून मागासवर्गीय समजाची असल्याने तिला वारंवार जातीवरुन घालुन पाडुन बोलुन तिचा अपमान करुन तिला हाताने मारहाण करून शारीरीक आणि मानसिक त्रास दिला आहे तसेच फिर्यादीचा दिर संदिप ओसवाल याने फिर्यादी घरात एकटी असाताना तिच्या एकांताचा फायदा घेवुन तिच्याशी शारीरीक लगट करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले सदर प्रकार हा 11/6/2016 पासून घडत असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे .
वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टरी दाखल करुन गुन्ह्याचा प्रथम वर्दि रिपोर्ट मा.हुजुर कोर्ट यांना रवाना करून पुढील तपास पोलीस निरीक्षक सिताराम डुबल करत आहेत.