Friday, October 18, 2024
Homeपुणेलोणावळासोमवारी देखील भुशी डॅम मार्गावर मोठी वाहतुक कोंडी..

सोमवारी देखील भुशी डॅम मार्गावर मोठी वाहतुक कोंडी..

लोणावळा (प्रतिनिधी): शहरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी लोणावळ्यातील भुशी डॅम व लायन्स पॉईंट येथे पर्यटकांची मोठी गर्दी आज सोमवारी पाहायला मिळाली.
पावसाळी सीजन मध्ये शनिवार रविवार व सुट्टीच्या दिवशी लाखो पर्यटक विविध शहरातून लोणावळ्यात पर्यटनासाठी येत असतात. परंतु आज सोमवारी देखील सहारा पूल ते लायन्स पॉईंट पर्यंत मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याठिकाणी पोलीस प्रशासनाचे हवे तसे वाहतूक नियोजन दिसून आले नाही. तसेच पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर पोलिसांनी जी नियमावली दिली होती त्या नियमांना मात्र पर्यटकांकडून केराची टोपली दाखविण्यात येत आहे.
रस्त्याच्या मध्येच वाहने पार्किंग करून वाहतूक कोंडीला निमंत्रण देत पर्यटक पोलिसांच्या वाहतूक नियोजनाचे तीन तेरा करतानाचे दृश्य आज पाहायला मिळाले.
- Advertisment -

You cannot copy content of this page