Saturday, November 23, 2024
Homeपुणेमावळस्थानिक भूमिपुतत्रांचे एल अँड टी कंपनी विरोधातील आंदोलनास स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा जाहीर...

स्थानिक भूमिपुतत्रांचे एल अँड टी कंपनी विरोधातील आंदोलनास स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा…

मावळ (प्रतिनिधी): मावळ तालुक्यातील तळेगाव एम आय डी सी मधील L & T कंपनीच्या 233 कामगारांचे गेली 10 दिवस झाले कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे, सदर आंदोलनास स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशभाऊ साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला.
तळेगाव एम.आय.डी.सी.मधील लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीतील 236 स्थानिक भूमीपुत्रांना अन्याय कारक पद्धतीने बदल्या केल्या आहेत.त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून ‘धरणे आंदोलन ‘ हाती घेतले. लार्सन अॅण्ड टुब्रो या कंपनीतील 236 कामगारांच्या महाराष्ट्रा बाहेर अन्यायकारक पद्धतीने बदल्या केल्या आहेत सदर कामगारांना तुटपुंज्या पगारावर गेली 10 वर्षांपासून काम करावे लागत आहे गेल्या 13 महिन्यांपासून बदलीच्या ठिकाणी नोकरीवर जाणे शक्य नसल्याने नोकरी नाही , पगार नाही अशी कामगारांची अवस्था आहे ऐन दिवाळी सनाच्या दिवशी पुणे येथील कामगार आयुक्त कार्यालयासमोर ठिव्या धरणे आंदोलन सुरू असून सदर आंदोलनास स्वाभिमानी रिपब्लीकन पक्ष मावळ तालुक्याच्या वतीने व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने जाहीर पाठिंबा दिल्याचे पत्र देण्यात आले.
यावेळी केंद्रीय सदस्य, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब गायकवाड, तालुका अध्यक्ष बबनराव ओव्हाळ, उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे, बाजीरावभाऊ ओव्हाळ, विजय साबळे, विलास गायकवाड, अनिल सरोदे, अमित सरोदे आदी कार्यकर्त्यांनी पुणे येथे जाऊन आंदोलनास पाठिंबा दिला.
- Advertisment -

You cannot copy content of this page