आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची कर्जत भाजप कार्यालयाला सदिच्छा भेट….
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) राज्यात असलेली भाजप शिवसेना महायुती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील कर्जत मतदार संघात कायम असावी , हि महत्त्वपूर्ण बाब डोळ्यासमोर ठेवत कर्जत-खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी भारतीय जनता पार्टीच्या कर्जत येथील कार्यालयास सदिच्छा भेट देत पदाधिकाऱ्यांची भेट घेतली .
लवकरच जिल्हा परिषद , पंचायत समिती , नगर परिषद, ग्रामपंचायत यांच्या निवडणुका होणार आहेत . या निवडणुकीत भाजप व शिवसेना शिंदे गटाने एकत्र येत निवडणूक लढवावी, यासंदर्भात सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली. यावेळी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकच सूर यावेळी व्यक्त केला . या बैठकीत उपस्थित मान्यवरांनी परस्पर सहकार्य व समन्वयातून मतदारसंघाच्या विकासासाठी एकत्रित वाटचाल करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार सुरेशभाऊ लाड, उत्तर रायगड जिल्हा महामंत्री दिपक बेहेरे, किसान मोर्चा राज्य उपाध्यक्ष सुनील गोगटे, जेष्ठ नेते व मा. सभापती तानाजी चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष मंगेश म्हसकर , मा. नगराध्यक्ष शरदभाऊ लाड तसेच मा. नगरसेवक ॲड संकेत भासे व मा. नगराध्यक्षा रजनी गायकवाड, जिल्हा सरचिटणीस रमेश दादा मुंडे, कर्जत शहर मंडल अध्यक्ष राजेश दादा लाड, नेरळ मंडलाध्यक्ष नरेश मसने, कर्जत ग्रामीण मंडलाध्यक्ष दिनेश रसाळ, नेरळ मंडल उपाध्यक्ष विनेश म्हस्के,तसेच श्रद्धा कराळे, कांता नीमने, सरस्वती चौधरी, शहर अध्यक्षा शर्वरी कांबळे, ऍड. सुषमा ढाकणे, देविदास बडेकर, विजय जिनगरे , शैलेश देशमुख, मंदार जाधव, वर्षा सुर्वे, किशोर ठाकरे, परेश वाघमारे, जनार्दन म्हस्कर, दर्शन ठाकरे, जिल्हा उपाध्यक्षा स्नेहा गोगटे, अतुल बडगुजर, वसंत महाडिक इत्यादी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी सदर चर्चेत उत्स्फूर्त सहभाग घेत आगामी निवडणुकांमध्ये युतीबाबत सहकार्याचे संकेत दिले. हि युती झाल्यास कर्जत तालुक्यातील राजकारणात नक्कीच वेगळे चित्र असेल , यांत शंकाच नसेल .